

Mexican President Sexual Harassment:
मॅक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाऊडिया शेनबाऊम यांना राष्ट्रपती भवनाच्या जवळच रस्तावर लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला. एक पुरूष हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने जवळ आला आणि त्यानं राष्ट्राध्यक्ष क्लाऊडिया यांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यानं त्यांना आक्षेपाह्यरित्या मिठी देखील मारण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मॅक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाऊंडिया या राष्ट्रपती भवनाजवळील रस्त्यावरून जात असताना लोकांसोबत हस्तांदोलन करत होत्या. अनेक लोकांनी त्यांच्यासोबत सेल्फी देखील घेतली. याचवेळी एक पुरूष च्यांच्याजवळ आला. त्यानं राष्ट्राध्यक्षांना पाठीमागून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानं राष्ट्रपतींना अवांच्छिक स्पर्श देखील केले. त्यानंतर तो त्यांचे चुंबन घेण्याचा देखील प्रयत्न करू लागला. यानंतर राष्ट्रपतींच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकानं त्या माणसाला राष्ट्रपतींपासून दूर केलं.
विशेष म्हणजे क्लाऊडिया या मॅक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यांनी या सगळ्या प्रकारानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यांना हा व्यक्ती इतर महिलांचा देखील लैंगिक छळ करत होता हे समजलं. दरम्यान, पोलिसांनी या पुरूषाला अटक केली आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रपती क्लाऊडिया यांनी, 'माझ्या मते जर मी तक्रार केली नाही तर इतर मॅक्सिकन महिलांच्या बाबतीत काय होईल? जर ते राष्ट्रपतींसोबत असं करू शकतात तर देशातील इतर महिलांसोबत काय होऊ शकतं?
सरकारने या पुरूषाचं हे वागणं एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रकार आहे. त्यामुळं सरकारनं सर्व राज्यात अशा प्रकारची कृती ही फौजदारी गुन्हा म्हणून गणण्यात यावा याबाबतची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या तरूणपणात देखील त्यांना या प्रकारच्या लैंगिक छळवणुकीचा सामना करावा लागला होता असं सांगितलं.
मॅक्सिकोमध्ये ३२ फेडरल डिस्ट्रिक्ट आहेत. त्यांचे स्वतःचे असे क्रिमिनल कोड आहेत. अनेक राज्यांमध्ये राष्ट्रपतींबाबत झालेले हे कृत्य फौजदारी स्वरूपाचा गुन्हा म्हणून गणला जात नाही.
राष्ट्रपतींनी जो व्यक्ती माझ्या जवळ आला तो पूर्णपणे ड्रंक होता. त्यानं ड्रग्ज घेतले होते. जोपर्यंत मी तो व्हिडिओ पाहिला नाही तोपर्यंत मला नेमकं काय झालं आहे याची कल्पना आली नाही.
मॅक्सिकोमधील १५ वर्षावरील जवळपास ७० टक्के महिलांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. ही माहिती युएन वुमननं दिली आहे.