हरवलेल्या प्रेमासाठी समुद्रात वणवण! त्सुनामीत पत्‍नी बेपत्‍ता; दहा वर्षांपासून पतीकडून शोध सुरूच

Published on
Updated on

टोकियो : पुढारी ऑनलाईन

प्रेम हे प्रेम असतं. इतिहासात प्रेमाची अनेक उदाहरणे आहेत. अशीच एका प्रेमाची गोष्‍ट समोर आली आहे. जपानमध्ये एक ६४ वर्षीय व्यक्‍ती आहे जो गेल्‍या १० वर्षांपासून समुद्रात पत्‍नीचा शोध घेत आहे. या व्यक्‍तीचे नाव यासुओ ताकामात्‍सु आहे. २०११ मध्ये जपानमध्ये मोठी त्सुनामी आली. ज्‍यामध्ये त्‍यांची पत्‍नी बेपत्‍ता झाली. तेव्हापासून ते आपल्‍या पत्‍नीचा शोध घेत आहेत. 

अधिक वाचा : सचिन वाझेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज 

यासुओंनी आपल्‍या पत्‍नीला शोधण्यासाठी अंडरवॉटर डायव्हिंग शिकुन त्‍याचे लायसन्स मिळवले आहे. गेल्‍या सात वर्षांपासून ते एकटेच अंडरवॉटर ड्रायव्हिंग करत आहेत. आपल्‍या पत्‍नीशी संबंधीत एखादी तरी गोष्‍ट मिळवण्यात आपल्‍याला यश मिळेल या भावनेने ते इतकी वर्षे अंडरवॉटर डायव्हिंग करत आहेत. जपान प्रशासन गेल्‍या अनेक वर्षांपासून अडीच हजार बेपत्‍ता लोकांचा शोध घेत आहे. यासाठी अंडरवॉटर शोधमोहीम देखील राबवण्यात येत आहे. या मोहिमेत यासुओ हे वैयक्‍तिक स्‍तरावर प्रयत्‍नशील आहेत. ते स्‍थानिक प्रशासनाला दर महिन्यात संपर्क साधून सर्च मोहिमेत सहभाग नोंदवतात. 

अधिक वाचा : राज्यात गेल्या २४ तासात तब्बल १५ हजार कोरोनाबाधितांची भर!

आतापर्यंत त्‍यांना पाण्यात अनेक कपडे,अल्‍बम यासोबतच अनेक प्रकारचे साहित्‍य मिळाले आहे. मात्र यामध्ये आतापर्यंत त्‍यांना त्‍यांच्या पत्‍नीची एकही वस्‍तू मिळालेली नाही. २०११ मध्ये आलेल्‍या त्सुनामीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ७०० किमीटर प्रतितास वेगाने तब्‍बल १३३ फूट उंच लाट जपानच्या उत्‍तरपूर्व किनाऱ्याला धडकली होती. यामध्ये फुकुशिमा न्यूक्‍लियर प्रकल्‍पाचेही नुकसान झाले होते. यूक्रेनच्या चेरनोबिल नंतर ही सर्वात मोठी न्यूक्‍लियर दुर्घटना मानली जाते. यामध्ये १५ हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्‍यू झाला होता. २ लाख ३० हजारपेक्षा अधिक लोकांना जीव वाचवण्यासाठी आपले घर सोडून पलायन करावे लागले होते.   

तसे पाहायचे झाले तर यासुओ आपल्‍या पत्‍नीसाठी इतके चिंतित नव्हते, कारण त्‍यांची पत्‍नी ज्‍या बँकेत काम करत होती. ती बँक एका डोंगराच्या पलीकडे होती. त्‍यामुळे त्‍यांना त्सुनामीत धोका कमी होता. मात्र सुनामीची तीव्रता वाढत गेल्‍याने या बँकेतील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. मात्र अनेक कर्मचारी त्सुनामीने आलेल्‍या पुरात बुडाले होते. यामध्ये यासुओ यांच्या पत्‍नीचाही समावेश होता. त्‍यानंतर त्‍यांची पत्‍नी अद्याप बेपत्‍ता आहे. 

अधिक वाचा : आणि शिल्पा शेट्टीने स्वत:च्या हेअर स्टायलिस्टला लगावली कानशिलात! (video)

यासुओ यांनी सांगितलं की, त्‍यांना त्‍यांच्या पत्‍नीचा अखेरचा संदेश मिळाला होता. ज्‍यात त्‍यांनी बँकेतील नोकरीने मी थकले असून, आता मला घरी यायचे असल्‍याचे म्‍हटले होते. यासुओ हे आजही मानतात की, जपानमध्ये आलेल्‍या त्‍या सुनामीच्या दशकभरानंतरही त्‍यांच्या पत्‍नीला घरी यायचं आहे. याच कारणामुळे अखेरच्या श्वासापर्यंत ते आपल्‍या पत्‍नीचा शोध चालू ठेवू इच्छितात. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news