चीनच्या समुद्रात महाकाय जहाजांचे दर्शन; ‘या‘ देशासाठी धोक्‍याची घंटा!

Chinese Ships | एखाद्या देशाचा जगापासून संपर्क तोडण्याची यंत्रणा विकसीत
Chinese Ships
चीनच्या समुद्रकिनाऱ्यावर उभी असलेली जहाजे. (Image Source X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण चीनमधील गुवांग्‍झू प्रातांतील समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या आकाराची तीन जहाजे दिसून आली आहेत. या जहाजांच्या छाचाचित्रांमुळे अनेक संरक्षणतज्ज्ञ चिंतेत आहेत. कारण या बार्जवर अशी यंत्रणा बसवली आहे की जी खोल समुद्राखाली असणाऱ्या इंटरनेटच्या केबल कट (फायबर ऑप्टीक केबल) करु शकते. याबाबतचे वृत्त सीएनएन या वृत्तवाहिनीने दिले आहे.

या देशासाठी धोका?

चीनचा शेजारी असलेल्‍या तैवानसाठी ही जहाजे धोकादायक असल्‍याचे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. चीनची नेहमीचीच असणारी आक्रमक, विस्‍तारवादी भूमिका नेहमीत शेजारी देशांना त्रासदायक ठरत असते. सध्या तैवानवर चिनी हक्‍क सांगू लागले आहेत. आपल्‍या सैन्यदलाच्या क्षमता वाढवण्यासाठी चीनची सत्ताधारी कम्‍युनिस्‍ट पार्टी नेहमीच प्रयत्‍नात असते. आही अशा पद्धतीच्या विशालकाय बार्ज तयार करुन तैवानवर दबाव आणण्याची त्‍यांची रणनिती आहे. अशा प्रकारे तैवान गिळंकृत करण्याचा चीनचा डाव आहे.

जगापासून संपर्क तोडण्याची क्षमता

सध्या इंटरनेटचे जाळे समुद्रतळाशी पसरलेल्‍या फायबर ऑप्टीक केबलमार्फतच चालते. पण या जहाजांमध्ये बसवलेली यंत्रणा समुद्राखाली केबल कापू शकते. यातून तैवानची संपर्कयंत्रणा बंद करण्याचा हा चीनीचा डाव असू शकतो, अशी भीती तज्ज्ञ व्यक्‍त करत आहे. चीन सध्या दररोज तैवानच्या ताब्‍यातील बेंटाजवळ फायटर जेट पाठवत असते.

सीएनएनच्या वृत्तानुसार, ही छायाचित्रे दक्षिण चीनमधील गुवांग्‍झू प्रातांतील झाजिंग किनाऱ्यावरील असल्‍याचे म्‍हटले आहे. हे ठिकाणी चीन नेव्हीच्या मुख्यालयापासून जवळच्या अंतरावर आहे. सरंक्षण विश्लेषक जे. मायकल डॅम व थॉमस शुग्रात यांच्या मते, या जहाजांमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. यामुळे चीनच्या पिपल लिबरेशन आर्मीच्या तैवानवरील आक्रमणासाठी अधिक लाभ होईल. तसेच कुठेही हलवता येणारा बंदर (घाट) विकसीत करत आहेत. ज्‍यामुळे टँक, लष्‍करी वाहने, अवजड साहित्‍य सहजरित्‍या वाहून नेता येणार आहे.

४ हजार मीटर खोलातील केबल कापू शकते

तैवान च्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली असून त्‍यांच्या मते ही जहाजे लढाईच्यावेळी टँक वाहून ती जमीनीवर उतरु शकतात, तसेच अनेक घातक शस्‍त्रे यावर तैनात केली आहेत. तसेच यातील सर्वात घातक हत्‍यार म्‍हणजे केबल कटर मशीन, या जहाजावर असे मशीन डेव्हलप केले आहे. जे समुद्र तळावरुन गेलेल्‍या इंटरनेट केबल सहज कापून काढू शकते. याची क्षमता ४००० मीटर खोलवरून गेलेली केबल कापण्याची आहे. यामुळे कोणत्‍याही देशाची दळणवळण यंत्रणा क्षणात बंद करण्याची व जगापासून संपर्क तोडण्याची क्षमता चीनकडे येणार आहे. याचा सर्वाधिक धोका तैवानला आहे. अशी भीतीही तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने व्यक्‍त केली आहे.

सोशल मीडियावर जहाजांची छायाचित्रे व्हायरल

मार्च महिन्यात चिनी सोशल मीडियावर ही या जहाजांची छायाचित्रे व्हायरल झाली होती. पण नंतर अचानक ती गायब झाली. या छायाचित्रांमध्ये समुद्रकाठाला महाकाय लँडिंग केलेली बार्जेस दिसत आहेत. त्‍याच्या बाजूला मासेमारी करणाऱ्या नौका आणि काही मोजके पर्यटकही उभे असल्‍याचे दिसतात.

तीन्ही जहाजे एकमेकांना जोडलेली

ही तीन जहाजे एकमेकांना जोडलेली दिसत आहेत. तर समुद्रामंध्ये मोठ मोठे खांब रोवल्‍याचे दिसत असून त्‍यावर ही उभी केली आहेत. त्‍यामुळे समुद्राच्या पाणीपातळीपासून ही उंच दिसत होती. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या व्यापाराचा प्राथमिकता देणाऱ्या "अमेरिका फर्स्ट" परराष्ट्र धोरणाने अमेरिकेच्या अनेक देशांशी असलेल्‍या जागतिक संबंधांमध्ये बदल होत आहे. कदाचित या धाेरणांमुळे चीनबरोबर अमेरिकेचे संबध सुधारु शकतात. या शक्‍यतेमुळे तैवानची चिंता वाढली आहे. कारण व्यापारी कारणांमुळे चिनच्या विस्‍तारवादी धोरणांकडे अमेरिका कानाडोळा करु शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news