पुढारी ऑनलाईन डेस्क : दहशतवादी संघटना हमासने ओलिस ठेवलेल्या ६ ईस्त्रायली नागरिकांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याचे रविवारी निदर्शनास आले. गाझामध्ये एका इस्रायली-अमेरिकन तरुणासह सहा ओलिसांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच इस्रायलमधील लाखो नागरिक युद्धविरामासाठी रस्त्यावरु उतरले. ओलिसांची हत्या झाल्याने ईस्त्रालयी नागरिकांमध्ये सत्तातपाची लाट उसळली आहे. (Israel-Hamas war )
इस्रायली लष्कराने गाझा पट्टीत सहा ओलिसांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हमाससोबत बंधक-युद्धविराम करार करावा, अशी जनतेची आग्रही मागणी आहे.' टाईम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, तेल अवीवमध्ये 300,000 हून अधिक लोक जमले होते. याशिवायदोन लाखांहून अधिक नागरिकांनी देशभरातील विविध आंदोलनांमध्ये भाग घेतला. तेल अवीवमध्ये निदर्शनाची सूरुवात डिझेंगॉफ स्ट्रीटपासून IDF मुख्यालयाच्या सुरुवातीच्या गेटपर्यंतच्या मोर्चाने झाली. शनिवारी रात्री सापडलेल्या मृतदेहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सहा प्रतीकात्मक शवपेट्या होत्या.
आंदोलकांनी अब-अबच्या घोषणा दिल्या. उर्वरित ओलिस नागरिकांना सुखरुप घरी आणण्यासाठी हमाससोबत युद्धविराम करण्याचे आवाहन त्यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना केले. निदर्शकांनी इस्रायली झेंडे, पिवळ्या फिती आणि ओलिसांच्या सन्मानार्थ सहा खून झालेल्या ओलिसांची माफी मागणारे फलक हातात घेवून रस्त्यावरु उतरले होते.
गाझामध्ये सहा ओलिसांच्या मृत्यूनंतर इस्रायलच्या सर्वात मोठ्या कामगार संघटनेने आज (दि. २ सप्टेंबर) देशभरात सर्वसाधारण संप पुकारला आहे. आरोग्य, वाहतूक आणि बँकिंग यासारख्या क्षेत्रातील 800,000 कामगारांचे प्रतिनिधित्व करणारी ट्रेड युनियन हिस्ताद्रुत यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी संप सुरू होईल. गाझामध्ये हमासने ओलीस ठेवलेल्या उर्वरित लोकांना परत आणता यावे यासाठी युद्धविरामासाठी सरकारवर दबाव वाढवणे हा या संपाचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 7 ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतरचा हा पहिलाच सामान्य स्ट्राइक असेल. गेल्या वर्षी एक सामान्य संप देखील झाला होता, त्यानंतर पंतप्रधान नेतान्याहू यांना न्यायालयीन सुधारणांसाठी त्यांची वादग्रस्त योजना पुढे ढकलावी लागली होती.