

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंबोडियाच्या घनदाट ग्रीन फॉरेस्टमधील जगंलात वेगवेगळ्या प्रजातींचे जीव सापडतात. आता केलेल्या ताज्या शोधमोहिमेनुसार येथील जगंलात काही नव्या प्रजाती आढळल्या आहेत. कंबोडिया व व्हिएतनाम देशांच्या उत्तरेला असलेल्यसा दुर्गम असलेल्या ॲनमाईडी डोंगररांग आहे. ही डोंगररांग जैवविविधतेने श्रीमंत असून याठिकाणी विरचे हे कंबोडियाचे सर्वात मोठे नॅशनल पार्क आहे. याबाबतचे वृत्त सीएनएनने दिले आहे.
याठिकाणचा जवळपास ३००० स्केअर किलोमिटरचे क्षेत्र संरक्षित क्षेत्र आहे. या जंगलामध्येच काही अनोख्या जीवांचा विकास झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये ‘ सुंदा पँगलॉन, गडद रंगाचा बिबट्या , मोठी शिंगे असलेले मुंटजॅक नावाचे हरिण, सोकोलोव्ह ग्लाास लिजार्ड (सरडा), लिफ टोड गेको (झाडांच्या पानांसाखा दिसणारा)व सोनेरी अस्वल आदी प्राण्यांचा समावेश आहे. अशा एकून ९ प्राण्याची नोंद याठिकाणी झाली आहे.
कंबोडियाच्या फाऊना आणि फ्लोरा या वन्यजिव क्षेत्र संवर्धन संघटनेचे संचालक अपाब्लो सिनोव्हास यांनी सांगितले की या जंगलात काही दुर्लभ असलेले प्राणी आढळून आले आहेत. आणि या प्राण्याच्या संरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
पण कंबोडियातील हा पार्क सध्या वृक्ष तोड , जंगलांचा विनाश करणे, प्राण्यासाठी सापळे लावने, वन्यजीव शिकारी आदींचा सामना करत आहे. १९९३ पासून गेल्या ३० वर्षात कंबोडियाचे जंगल क्षेत्र जवळपास ३० टक्क्यांहून कमी झाले आहे. बेकायदेशीर जंगलतोड यासाठी कारणीभूत आहे.
या जगंलात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये अनेक जीव दिसून आले आहेत. जंगली कुत्री, ऍशिअन काळे अस्वल, डुकराच्या शेपटीसारखी मकॉक माकडे सापडली आहेत. या शोधमोहिमेत १६१ प्रकारच्या प्रजाती आढळल्या आहेत. यामध्ये नामषेश होण्याच्या मार्गावर असलेला डॉर्फ लाऊच नावाचा मासा, आशियाई मऊ कवचाचे कासव, आशियाई काळे अस्वल, गिबॉन प्रजातीची माकडे या माकडांचे जवळपास २००० टोळ्या या विरचे या जंगलात आढळल्या.