Israel attacks Lebanon | लेबनॉनमधील संघर्ष तीव्र; मृतांची संख्या 570 वर

1,444 जखमी
Israel attacks Lebanon |
Israel Lebanon tensions | लेबनॉनमधील संघर्ष तीव्र; मृतांची संख्या 570 वर
Published on
Updated on

बेरूत; वृत्तसंस्था : लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या तीव्र संघर्षामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला असून, देशाच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत किमान 570 जणांचा मृत्यू झाला आहे. सततच्या हवाई हल्ले आणि स्फोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार फक्त मंगळवारच्या हल्ल्यांमध्येच 84 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. या संघर्षात जखमींची संख्याही झपाट्याने वाढली असून एकूण 1,444 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 131 जण मंगळवारीच जखमी झाल्याची नोंद आहे. या हल्ल्यांमध्ये आपत्कालीन सेवांनाही मोठा फटका बसला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार रेड क्रॉसचे पॅरामेडिक युसूफ असाफ यांचादेखील मृत्यू झाला आहे. ते जखमींना मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले असताना हल्ल्यात सापडल्याचे सांगितले जाते.

मंत्रालयाने या घटनेचा तीव्र निषेध करत रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांवर हल्ले करणे हे आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. संघर्ष वाढत असताना सामान्य नागरिक, वैद्यकीय कर्मचारी आणि बचाव पथके मोठ्या धोक्यात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाढत्या हिंसाचारामुळे लेबनॉनमध्ये मानवीय परिस्थिती अधिक गंभीर होत असून, अनेक भागांत मदत आणि वैद्यकीय सेवांची तातडीची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news