Crime News: केरळच्या ३ मैत्रिणींनी कॅलिफॉर्नियात ओनम साजरा केला; दोन दिवसांनी दोघींचा मृतदेह आढळला, तिसरी पोलीसांच्या ताब्यात

Kerala women found dead
Kerala women found dead pudhari
Published on
Updated on

Kerala women found dead in California apartment: केरळमधील वेगवेगळ्या भागातील तीन महिला या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे एका अपार्टमेंटमध्ये एकत्र रहात होत्या. त्या तिघी देखील एकमेकींना जवळून ओळखत होत्या. गेल्या आठवड्यात त्यांनी एकत्र ओनम साजरा केला होता. दोन दिवसांनी तिघींपैकी एकीचा मृतदेह अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आणि दुसरीचा मृतदेह हा फ्लॅटमध्ये आढळून आला. तिसऱ्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिच्यावर दोघींपैकी एकीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Kerala women found dead
Nagpur crime news: बुटीबोरीत मेफेड्रोन तस्करीचा पर्दाफाश; ७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कॅलिफोर्नियामधील मिलपिटासमध्ये ही घटना २८ ऑगस्ट रोजी झाल्याचे वृत्त आहे. यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून दोन्ही महिलांच्या कुटुंबीयांना हो मोठा धक्का बसला आहे. या घटनेमागे नेमका उद्येश काय होता हे अजून समजलेलं नाही. पोलिसांकडून देखील दोन्ही मृत महिलांची ओळख सांगण्यात आलेली नाही.

Kerala women found dead
Crime News : लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर अत्याचार

मात्र केळमध्ये पोहचलेल्या माहितीनुसार मृत महिलांमध्ये ३५ वर्षाच्या अंजना हरी आणि ४० वर्षाच्या अॅन मॅरी मॅथ्यू यांचा समावेश आहे. अंजना त्रिशूरच्या होत्या तर मॅथ्यू या मुळच्या तिरूवअनंतपुरमच्या होत्या. त्यांची मैत्रिण ३२ वर्षाच्या अनिला यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे अंजनाच्या मृत्यूशी कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे.

Kerala women found dead
Crime News : पैशाच्या वादातून डोक्यात हातोडी घालून मामेभावाची हत्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news