

IIT Kanpur alumnus Trapit Bansal $100 million AI bonus Meta Superintelligence Ex-OpenAI researcher
नवी दिल्ली : आयआयटी कानपूरचा माजी विद्यार्थी आणि OpenAI मधील संशोधक त्रपित बन्सल हे आता Meta च्या अत्याधुनिक Superintelligence Labs मध्ये सामील झाले आहेत.
त्यांच्या या ऐतिहासिक नियुक्तीने केवळ भारतीय संशोधकांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील पतच वाढवली नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात भारताच्या सहभागालाही नवे वळण दिले आहे.
त्रपित बन्सल हे आयआयटी कानपूरचे पदवीधर असून त्यांनी गणित आणि सांख्यिकी या विषयांतून दुहेरी पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी UMass Amherst येथून संगणक विज्ञानात पीएच.डी. पूर्ण केली, ज्यामध्ये त्यांनी meta-learning, deep learning आणि natural language processing या क्षेत्रांवर संशोधन केले.
Accenture ते मेटापर्यंतचा प्रवास
बन्सल यांचा प्रवास एका सामान्य सल्लागार कंपनीपासून सुरू झाला – 2012 मध्ये ते Accenture मध्ये विश्लेषक होते. त्यानंतर IISc बंगळूरूमध्ये त्यांनी संशोधन सहाय्यक म्हणून Bayesian मॉडेलिंग आणि अनुमान पद्धतींवर काम केले.
पुढे Facebook, Google, Microsoft आणि OpenAI सारख्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करत त्यांनी स्वतःला AI संशोधनात झोकून दिले.
2022 मध्ये त्रपित बन्सल OpenAI मध्ये पूर्णवेळ कर्मचारी म्हणून रुजू झाले. त्यांनी संस्थापक इलिया सुत्स्केवर यांच्यासोबत रिइन्फोर्समेंट लर्निंग आधारित रिझनिंग मॉडेल्स विकसित केली.
याच संशोधनामुळे OpenAI चे अत्यंत लोकप्रिय रिझनिंग एनेबल्ड मॉडेल "o1" अस्तित्वात आले, जे ChatGPT च्या अंतर्गत लॉजिक सिस्टमचा गाभा मानले जाते.
आता मेटा सुरपइंटेलिजन्स लॅब्समध्ये काम करणार
Meta (पूर्वीचे Facebook) ने आपल्या नवीन सुपरइंटेलिजन्स लॅब्सचे उद्घाटन नुकतेच केले. हे डिव्हिजन मार्क झकरबर्ग यांच्या AGI – Artificial General Intelligence – निर्माणाच्या महत्वाकांक्षी योजनेचा भाग आहे.
ही लॅब Scale AI चे माजी CEO अलेक्झांडर वांग आणि GitHub चे माजी CEO नॅट फ्रीडमन यांच्या नेतृत्वाखाली चालवली जाते.
प्रसारमाध्यमातील काही वृत्तांनुसार, Meta आता AI क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिभावतांना आकर्षित करण्यासाठी 100 ते 300 मिलियन डॉलर (भारतीय रुपयात अंदाजे 800 कोटींपर्यंत) चा साइनिंग बोनस देत आहे.
बन्सल यांच्या ऑफरचे अचूक तपशील जाहीर झालेले नाहीत, परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टॉक ऑप्शन्स आणि अत्याधुनिक कम्प्युट अॅक्सेस समाविष्ट असण्याची शक्यता आहे.
OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनीही यापूर्वी Meta वर आरोप केला होता की ते OpenAI मधील सर्वोच्च संशोधकांना 100 मिलियन डॉलर्स पर्यंतचे ऑफर्स दिली जात आहे. बन्सल यांच्यासारख्या संशोधकांच्या बाहेर पडण्यामुळे या दाव्यांना वजन मिळत आहे.
त्रपित बन्सल यांची Meta मध्ये निवड केवळ त्यांची वैयक्तिक कामगिरीच दर्शवत नाही, तर भारतातील AI संशोधनाची गुणवत्ता आणि संभाव्यता सिद्ध करते.
अशा निवडींमुळे भारतीय तरुण संशोधकांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे, आणि भारताला जागतिक AI क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देण्याची क्षमता वाढणार आहे.
बन्सल यांचा Meta च्या AI सुपरइंटेलिजन्स टीममध्ये प्रवेशामुळे त्यांच्या सखोल ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ Meta च्या AGI डिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा टप्पा केवळ एका IITian चा वैयक्तिक विजय नसून, जागतिक पातळीवर भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचे प्रतीक ठरणार आहे.