

John Cena जगभरातील WWE च्या फॅन्सचा लाडका रेसलर जॉन सिना याने आज अखेरचा सामना खेळला. आपल्या 23 वर्षाच्या देदिप्यमान कारर्किदीची शेवटही तितकाच भावनिक पद्धतीने केला. आज फायटिंग रिंगमध्ये त्याने शेवटची मॅच खेळली. रविवारी झालेल्या या "सॅटरडे नाईट मेन इव्हेंट" मधील त्याच्या शेवटच्या सामन्यात, त्याला गुंथरकडून Gunther पराभव पत्करावा लागला. यावेळी त्यांने प्रेक्षकांच्या टाळ्याच्या कडकडात रिंगचा सन्मान राखत बाहेर पडला. टीशर्ट शूज, आर्मबॅन्ड रिंगमध्येच ठेवत त्यांने प्रेक्षकांचा निरेप घेतला यावेळी वातावरण भावूक झाले होते.
डब्ल्यूडब्ल्यूइ चा हिरो
2002 मध्ये जॉन पहिल्यांदा रिंगमध्ये उतरला होता. 16 वेळा World Champion, 5 वेळा United States Champion, 2 वेळा Royal Rumble विजेता असलेला जॉन सिनाला WWE मध्ये खूप प्रेम मिळाले. WrestleMania मध्येही तो खूप लोकप्रिय होता. अनेक चाहते त्याला रेसलिंग रिंगचा हिरो वाटतो. जॉनचा साधा चेहरा अनेकांना भावला. या रिंगमध्ये येणारे चेहरे प्रचंड आकाराची शरिरे भयानक पद्धतीने दिसने यापेक्षा जॉन वेगळा होता.
शेवटच्या सामन्यात जरी हार पत्करली तरी अनेकांच्या हृदयावर जान सिनाचे नाव कोरले आहेत. त्याचा शेवटचा सामना बघण्यासही लाखो चाहते उपस्थ्ज्ञित होते. गुंथूर हा तुलनेने नवीन व ताकदवान व अनुभवी जॉन यांनी वॉशिंग्टन डीसीच्या प्रेक्षकांना शेवटचा एक शानदार सामना पाहायला मिळाला. गुंथरने अप्परकट आणि काही तीक्ष्ण चॉप्स वापरून सीनाला बाद करून सामन्याची सुरुवात केली, परंतु लवकरच सीनाने त्याच्या सिग्नेचर मूव्ह्सचा धमाका केला.
रिंगमध्ये प्रवेश करताच, सीनाचे टाळ्यांच्या कडकडाटात आणि त्याच्या थीम गाण्याने स्वागत करण्यात आले, सामना सुरू होण्यापूर्वी, सीनाने त्याचा जुना प्रतिस्पर्धी आणि मित्र, कर्ट अँगल (त्याचा पहिला WWE प्रतिस्पर्धी), RVD, केविन ओवेन्स, सामी झेन आणि मार्क हेन्री यांची भेट घेतली, जे रिंगसाईडवर उपस्थित होते.
Never Give Up टीशर्ट - शॉर्ट व आर्मबँडसह टोपी ही वेगळी ओळख
मैदानावर जॉन सिना यायाचा त्याचा फिक्स पेहराव होतो डेनिम शॉर्ट व आर्मबॅन्ड ही त्याची ओळख होती. त्याची बॉडीलॅग्वेजचे अनेक चाहते आहेत. तसेच त्याच्या एन्ट्रीचे म्युझिकही खूपच आकर्षक होते. मुलांमध्ये तो खूप लोकप्रिय होता. पराभवानंतर, सीनाने प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाला मान देत आपला टी-शर्ट आणि रिस्टबँड रिंग आर्मबँड व शूज रिंगमध्येच सोडले. यावेळी तो भावूक झाल्याचे दिसले. त्याच्या आर्मबँड वर बहूतेकवेळी Never Give Up हा संदेश लिहलेला असायचा.
जॉनी सीनाच्या अंतिम लढतीनंतर, अनेक दिग्गज WWE कुस्तीपटू त्याला निरोप देण्यासाठी आले. लॉकर रूममधील सर्व दिग्गज कुस्तीपटू जॉनी सीनाच्या त्याच्या शानदार कारकिर्दीबद्दल अभिनंदन करण्यासाठी आले. यामध्ये ट्रिपल एच, स्टेफनी मॅकमोहन, सीएम पंक, आणि द अंडरटेकर यांचा समावेश होता.
अभिनय क्षेत्रात राहणार कार्यरत
लोकप्रियता मिळाल्यानंतर गेल्या काही वर्षात जॉन सिना हॉलिवूडमध्ये दिसत आहे. अनेक सुपरहिट फिल्मचा तो भाग राहिला आहे. Fast & Furious 9 , The Suicide Squad या चित्रपटाचा तो हिस्सा होता. आता रेसलिंगमधून रिटायर झाल्यानंतर तो फिल्ममध्ये कार्यरत राहणार आहे.