नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
सौदी अरेबियातील रियाध विमानतळावर जेट एअरवेज विमानाचा अपघात थोडक्यात टळला. हे विमान धावपट्टीवरून खाली घसरल्याची घटना आज सकाळी घडली. मात्र, सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
जेट एअरवेजचे विमान रियाध येथून मुंबईकडे उड्डाण करणार होते. त्यापूर्वीच विमान धावपट्टीवरून खाली आले. मात्र, तत्काळ विमानातील १४२ प्रवासी आणि सात कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
विमान धावपट्टीवरून खाली आल्यानंतर प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, असे जेट एअरवेजकडून सांगण्यात आले आहे.