जेफ बेझॉस पुन्हा चढणार बोहल्यावर; पत्रकार लॉरेन सांचेझसोबत 'या' शहरात डेस्टिनेशन वेडिंग

Jeff Bezos, Lauren Sanchez Marriage: सुपरयॉटवर रंगणार विवाह सोहळा
Jeff Bezos, Lauren Sanchez Marriage:
Lauren Sanchez Jeff Bezos x
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्कः ई-कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉनचे संस्थापक आणि एलन मस्क यांच्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेझॉस पुन्हा बोहल्यावर चढणार आहेत. सुमारे 6 वर्षांच्या डेटिंगनंतर ते त्यांची मैत्रिण पत्रकार लॉरेन सांचेझ हिच्याशी लग्न करणार आहेत.

युरोपमधील रोमँटिक शहर असलेल्या व्हेनिसमध्ये दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या लग्नाच्या पत्रिका निवडक व्हीव्हीआयपींना पाठवल्या गेल्या असल्याचेही सांगितले जात आहे. (Jeff Bezos, Lauren Sanchez to tie the knot in Venice)

जेफ बेजोस आणि लॉरेन सांचेझ यांनी 2019 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती तेव्हापासून ते एकत्र राहत आहेत. दरम्यान, या दोघांच्या भव्य लग्न सोहळ्यात तंत्रज्ञान आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता आहे.

मे 2023 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी हा विवाह होत आहे. सन 2019 मध्ये बेजोस यांनी त्यांच्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता. तर सन 2023 मध्ये लॉरेन यांनी त्यांच्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता.

आता यंदा जून महिन्यात दोघे लग्न करणार असल्याची माहिती आहे. या ग्रँड विवाहासाठी पाहुण्यांना आमंत्रणे पाठवायला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, लग्नाची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

सुपरयॉटवर होणार विवाह

बेजॉस यांच्या अत्याधुनिक आणि 500 दशलक्ष डॉलर (सुमारे 4,150 कोटी रूपये) किमतीच्या "कोरु" सुपरयॉटवर हा विवाहसोहळा होणार आहे. ही सुपरयॉट इटलीच्या किनाऱ्यावर आहे. ही यॉट (नौका) बेजॉस यांच्यासाठी खूप महत्वाची आहे.

कारण याच यॉटमध्ये बेजॉस यांनी लॉरेन सांचेझला प्रपोज केले होते आणि त्यानंतर त्यांच्या साखरपुड्याचा जल्लोषही याच यॉटवर झाला होता. साखरपुड्याच्या वेळी सांचेझ यांनी 20 कॅरेटच्या हिऱ्याची अंगठी घातली होती. तिची किंमत 2.5 दशलक्ष डॉलर (सुमारे 20 कोटी रूपये) किमतीची असल्याचे म्हटले जाते.

कोण आहे लॉरेन सांचेझ?

लॉरेन सांचेझ यांचा जन्म 1969 मध्ये अल्बुकर्क, न्यू मेक्सिको येथे झाला. त्या एकेकाळच्या न्यूज टीव्ही अँकर आणि एंटरटेन्मेंट रिपोर्टर आहेत. 2011 ते 2017 या काळात "गुड डे LA" या मॉर्निंग शोच्या सह-संयोजिका म्हणून त्या काम पाहत होत्या. त्याशिवाय "द लॉन्गेस्ट यार्ड", "फाइट क्लब" आणि "टेड 2" यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

सांचेझ यांनी पूर्वी हॉलिवूड एजंट पॅट्रिक व्हाइटसेल यांच्याशी विवाह केला होता दोघांना एला आणि इव्हान अशी दोन मुले आहेत. याशिवाय माजी NFL खेळाडू टोनी गोंझालेझ यांच्यापासून लॉरेन यांना निक्को हा 23 वर्षीय मुलगादेखील आहे.

जेफ बेजोस यांच्या पहिल्या पत्नीविषयी...

जेफ बेजोस यांचे यापुर्वी मॅकेंझी स्कॉट यांच्याशी विवाह झाला होता. दोघेही 1993 ते 2019 या काळात एकत्र राहत होते. त्यांना चार मुले आहेत. दोघांचा 2019 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर मॅकेंझी स्कॉट यांना अॅमेझॉनमधील 25 टक्के शेअर्स मिळाले. त्यावेळी त्याची किंमत सुमारे 38 अब्ज डॉलर्स होती. मात्र, त्या समभागांवरील नियंत्रण जेफ बेझोसकडे राहावा यासाठी मॅकेंझी यांनी अमेझॉन कंपनीतील मतदानाचे हक्क सोडले होते. हा इतिहासातील सर्वात महागड्या घटस्फोटापैकी एक ठरला होता. मॅकेंझी स्कॉट यांनी सुमारे 16 अब्ज संपत्ती दान केली आहे. तरीदेखील त्या अजुनही जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news