

टोकीयो येथे दरवर्षी वर्षाच्या सुरवातील पार पडणारा ब्लू .फिन टूना माशांचा लिलाव 5 जानेवारी रोजी पार पडला. हा जगप्रसिद्ध लिलाव तेथे मिळाणाऱ्या माशांच्या किंमतीसाठी ओळखला जातो. यामध्ये यंदा पाठीमागील किंमतींचे सर्व रेकॉर्ड ब्रेक झाले असून. सर्वात मोठ्या 243 किलोच्या एका ब्लू फिन टूनाला आतापर्यंतचह सर्वात मोठी रक्कम मिळाली. या माशाला ५१०.३ दशलक्ष येन (अंदाजे ३.२ मिलीयन डॉलर्स) इतकी किंमत मिळाली. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत तब्बल 29 कोटी रुपये इतकी जाते.
टोकीयो शहरातील तोयोसू (Toyosu) मासळी बाजारात हा लिलाव दरवर्षी पार पडतो. यंदा 5 तारखेल नवीन वर्षाचा पहिला 'ब्लूफिन टूना' माशाचा लिलाव पार पडला. यावर्षी लिलावात या 243 किलोच्या टूना माशाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
यापूर्वी 2019 मध्ये मिळाली होती सर्वाधिक किंमत
दरवर्षी होणाऱ्य या लिलावात मोठ्य आकाराच्या माशांना कोट्यवधींची किंमत मिळते. जगभरातून या बाजारातील किंमतीवर लक्ष असते. यापूर्वी २०१९ मध्ये एका माशाला ३३३.६ दशलक्ष येन इतकी किंमत मिळाली होती. हा आतापर्यंतचा रेर्कार्ड होता. हा विक्रम मोडून यंदा 510 दशलक्ष येन किंमत मिळाल्याने यंदाचा हा इतिहासातील सर्वात महागडा टूना मासा ठरला आहे.
काय आहे या माशाचे वैशिष्ट्ये
या माशाचे वजन २४३ किलो (सुमारे ५३५ पाउंड) होते. मासा जपानच्या उत्तरेकडील ओमा (Oma) किनारपट्टीवर (आओमोरी प्रांत) पकडण्यात आला होता. ओमा येथील टूना मासे त्यांच्या उच्च गुणवत्तेच्च्या मांसासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. असातात जपानमध्ये या माशाची सुशी खूप लोकप्रिय आहे. त्यासाठीच हा मासा खरेदी केला जातो.
का होतो लिलाव व एवढी रक्कम का मोजली जाते
जपानमध्ये वर्षाच्या पहिल्या लिलावात महागडा मासा खरेदी करणे हे शुभ मानले जाते आणि हा एक प्रकारचा मार्केटिंगचा भागही असतो. त्यामुळे अनेक रेस्टॉरंट चेन चे मालक यामध्ये भाग घेतात. तसेच केवळ जपानच नाही इतर देशातील सुशी रेस्टारंट या लिलावता भाग घेतात. मोठी किंमत दिल्याने संबधित रेस्टॉरंटला प्रसिद्धीही खूप मिळते.