Dating App: जोडीदार शोधण्यासाठी सरकार देणार पैसे; 'या' देशात डेटिंग ॲप्स वापरणाऱ्या तरुणांना मिळणार १२ हजार रुपये

डेटिंग ॲप्स वापरणाऱ्या अविवाहित तरुणांना सरकारकडून वार्षिक १२,००० रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
Dating App
Dating App file photo
Published on
Updated on

Japan dating app subsidy

टोकियो: जपानमधील घटत्या जन्मदराची समस्या सोडवण्यासाठी आता तेथील स्थानिक प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. जपानच्या 'कोची' प्रांताने तरुणांना जोडीदार शोधण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक अनोखी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, डेटिंग ॲप्स वापरणाऱ्या अविवाहित तरुणांना सरकारकडून वार्षिक २०,००० येन (सुमारे १२,००० रुपये) इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

कोची प्रांत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २० ते ३९ वयोगटातील तरुण-तरुणी या अनुदानासाठी पात्र असतील. १ एप्रिल २०२६ पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. "ज्या तरुणांना लग्न करण्याची आणि जोडीदार शोधण्याची इच्छा आहे, त्यांना आर्थिक मदत करून प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे," असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. या योजनेअंतर्गत डेटिंग ॲप्सचे सदस्यत्व शुल्क, नोंदणी शुल्क आणि मासिक खर्च यांसाठी शासन परवानगी देणार आहे. विशेष म्हणजे, २०,००० येनची मर्यादा संपेपर्यंत तरुण कितीही वेळा या सवलतीचा लाभ घेऊ शकतात.

Dating App
Extramarital Dating App: विवाहबाह्य डेटिंग ॲपवर महिलांची संख्या का वाढतेय? 'अशा' पुरुषांना देतात सर्वाधिक पसंती

केवळ व्यक्तींनाच नव्हे, तर जोडीदार निवडण्यासाठी ज्या संस्था मेळावे आयोजित करतात त्यांनाही कोची प्रशासन मदतीचा हात देत आहे. अशा कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या संस्थांना १ लाख येनपर्यंत (सुमारे ५८,७९५ रुपये) अनुदान दिले जाणार आहे. याद्वारे तरुणांना एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जपानसमोर लोकसंख्येचे गंभीर संकट

जपानमधील जन्मदराची आकडेवारी पाहता परिस्थिती चिंताजनक आहे. २०२५ मध्ये जपानमध्ये केवळ ७,०५,८०९ बालकांचा जन्म झाला. १८९९ नंतरची ही सर्वात कमी संख्या आहे. जन्मदरात घट होण्याचे हे सलग १० वे वर्षे आहे. जपानमध्ये ६५ वर्षांवरील नागरिकांची संख्या ३.६२ कोटींवर पोहोचली असून, हे एकूण लोकसंख्येच्या २९.३ टक्के इतके आहे.

जपान सरकारने 'हा' निर्णय का घेतला?

वाढती महागाई, आर्थिक अस्थिरता आणि करिअरला प्राधान्य देण्याच्या वृत्तीमुळे जपानमधील तरुणांमध्ये विवाहाचे प्रमाण कमी होत आहे. या आर्थिक दबावामुळे अनेक तरुण कुटुंब नियोजनापासून लांब राहत आहेत. हीच दरी भरून काढण्यासाठी आता जपान सरकार थेट 'डेटिंग'साठी आर्थिक मदत पुरवत आहे.

Dating App
dating fraud case | 'डेटिंग'च्या जाळ्यात ५०० महिला अडकल्या! लग्नाचे आमिष दाखवून २ कोटींचा गंडा घालणारा महाठग जेरबंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news