

पुढारी ऑनलाईन डेस्क : जपानमध्ये आज (दि. ८) भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी मोजण्यात आली आहे. यानंतर जपानच्या नैऋत्य मियाझाकी प्रांतात त्सुनामी धडकली आहे. जपानच्या क्युशू आणि शिकोकू बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपासोबतच मियाझाकी, कोची, इहिमे, कागोशिमा आणि आयतासह जपानमधील अनेक किनारी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. मियाझाकी, क्युशूमध्ये 20 सेमी उंच समुद्राच्या लाटा उसळताना दिसल्या. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Japan Earthquake)
क्यूशू आणि शिकोकू या नैऋत्येकडील बेटांना गुरुवारी दोन शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसले. यानंतर त्सुनामी जपानच्या नैऋत्य मियाझाकी प्रांतात धडकली आहे. ६.९ आणि ७.१ तीव्रतेचे भूकंप अनुक्रमे क्युशू आणि शिकोकू बेटाला बसले आहेत. (Japan Earthquake)