Japan earthquake | जपानला शक्तिशाली भूकंपाचा धक्का : त्सुनामीचा इशारा

japan earthquake |
Japan earthquake | जपानला शक्तिशाली भूकंपाचा धक्का : त्सुनामीचा इशाराFile photo
Published on
Updated on

टोकियो; वृत्तसंस्था : उत्तर जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. जपानच्या हवामान संस्थेने (जेएमए) या भागात त्सुनामीचा इशारा दिला आहे. या परिसराला तीन मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामी लाटा धडकण्याची शक्यता वर्तवली आहे.

जेएमएने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार, सायंकाळी 5.32 वाजता 70 सें.मी. उंचीची लाट किनार्‍यावर धडकली होती. उत्तर जपानमधील एका बंदराला 80 सें.मी. (31 इंच) उंचीच्या त्सुनामी लाटेचा तडाखा बसला, तर इवाते, ओमोरी आणि आग्नेय होक्काइडोसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता.

जपान हवामान संस्थेनुसार, इवाते प्रांतातील कुजी बंदरात सायंकाळी 5.34 वाजता ही त्सुनामी लाट दिसून आली. तत्पूर्वी 5.32 वाजता 70 सें.मी.ची लाट धडकल्याचे जेएमएने म्हटल्याचे वृत्त एएफपीने दिले आहे. याच प्रांतातील दुसर्‍या एका बंदरावर 40 सें.मी. (1.3 फूट) उंचीची लहान त्सुनामी लाटही नोंदवण्यात आली.

ईशान्य जपानला मोठ्या भूकंपाचा इशारा

ईशान्य जपानमधील रहिवाशांना यापेक्षाही मोठ्या भूकंपासाठी तयार राहण्याचा इशारा अधिकार्‍यांनी दिला आहे. या भूकंपामुळे विस्तीर्ण परिसरात त्सुनामीचा तडाखा बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news