आता कपडेच नाही, तर ‘वॉशिंग मशिन’ धुणार माणूसच; 15 मिनिटांत व्हाल ताजेतवाने!

जपानने पुन्हा एकदा आपल्या अफाट तांत्रिक क्षमतेने जगाला चकित केले
Japan develops human washing machine
आता कपडेच नाही, तर ‘वॉशिंग मशिन’ धुणार माणूसच; 15 मिनिटांत व्हाल ताजेतवाने!Pudhari File Photo
Published on
Updated on

टोकियो : जपानने पुन्हा एकदा आपल्या अफाट तांत्रिक क्षमतेने जगाला चकित केले आहे. ओसाका येथील सायन्स कंपनीने ‘मिराई निनगेन सेंताकुकी’ नावाची ‘मानवी वॉशिंग मशिन’ सादर केली आहे. हे एआय तंत्रज्ञानावर आधारित शॉवर कॅप्सूल केवळ 15 मिनिटांत माणसाला अंघोळ घालून, शरीर सुकवून पूर्णपणे ताजेतवाने करते.

या पारदर्शक कॅप्सूलमध्ये बसल्यावर, हायस्पीड वॉटर जेटस् आणि सूक्ष्म बुडबुड्यांच्या (मायक्रोबबल्स) साहाय्याने त्वचेची सखोल स्वच्छता केली जाते. हे बुडबुडे फुटल्यावर निर्माण होणार्‍या दाब-लहरींमुळे त्वचेतील घाण बाहेर फेकली जाते. यासाठी कोणत्याही रसायनांची गरज नाही.

यात बसवलेले सेन्सर्स हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान मोजतात, ज्याच्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाण्याचे तापमान नियंत्रित करते. वापरकर्त्याच्या मनःस्थितीनुसार समुद्राच्या लाटांचे व्हिडीओ किंवा शांत संगीत दाखवून मानसिक आरामही दिला जातो. हे उपकरण केवळ शारीरिक स्वच्छता न करता मानसिक आरोग्याचाही विचार करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news