

पुढारी ऑनलाईन : इस्रायलने आज पहाटे (दि. २० मार्च) गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ला केला. यामध्ये किमान ५८ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत, असे वृत्त 'AP'ने गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, ताज्या हल्ल्यांवर इस्रायली सैन्याकडून त्वरित कोणतीही माहिती जारी करण्यात आलेली नाही. (Israel-Hamas war)
बुधवारी रात्री उशिरा आणि गुरुवारी पहाटे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ५८ पॅलेस्टिनी ठार झाले. मध्यरात्री अनेक घरांवर हल्ला झाला. पुरुष, महिला आणि मुले झोपेत असताना मृत्युमुखी पडल्याचे गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे.
मंगळवार, दि. १८ मार्च रोजी युद्धविराम मोडत काढत इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ला केला होता. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारीच ४०० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले, ज्यात बहुतेक महिला आणि मुले होती. हमानसे स्वाक्षरी केलेल्या करारापासून दूर जाणाऱ्या नवीन प्रस्तावाला नकार दिल्याचा दावा करत इस्रायलने हमासवर पुन्हा एकदा झालेल्या युद्ध लादल्याचा आरोप केला आहे.
आम्ही फक्त हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत असल्याचा दावा इस्रायलचे लष्कर करत आहे. तर या हवाई हल्ल्यांमध्ये महिला आणि मुले मृत्युमुखी पडत असल्याचा दावा पॅलेस्टिनकडून केला जात आहे. दरम्यान, अमेरिका, इजिप्त आणि कतार यांच्या मध्यस्थीनंतर जानेवारी २०२५मध्ये झालेल्या युद्धबंदी करारात सांगितल्याप्रमाणे, कायमस्वरूपी युद्धबंदी आणि गाझामधून संपूर्ण इस्रायली माघार घेण्याच्या बदल्यातच हमास उर्वरित ओलिसांना सोडेल असे म्हटले आहे.