हमासचा संपूर्ण नायनाट होईपर्यंत युद्ध सुरुच राहणार

अमेरिकेच्‍या संसदेत इस्रायलच्‍या पंतप्रधानांचा निर्धार
Israeli PM Benjamin Netanyahu
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज (दि.२५) अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले.X
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हमास विरुद्धच्‍या युद्धामध्‍ये प्रत्‍येक नागरिकाचा मृत्‍यू ही इस्रायलसाठी शोकांतिका आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमात इस्रायलची बदनामी व्हावी म्हणून पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू व्हावा, अशी दहशतवादी संघटना हमासची इच्छा आहे. पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची मानवी ढाल बनवत इस्रायलवर दबाव आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. हमासने ७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी केलेल्‍या हल्ला पुन्हा करण्याचा कट रचला जात आहे; पण मी तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो की, माझ्यावर कितीही दबाव आला तरी मी पुन्‍हा इस्रायल हल्‍ला कधीही होऊ देणार नाही. जोपर्यंत हमासचा पूर्णपणे नायनाट होत नाही तोपर्यंत युद्ध संपणार नाही, असा निर्धार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ( Israeli PM Benjamin Netanyahu ) यांनी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना केला.

हमासवरील आमचा विजय इराणसाठी मोठा धक्का असेल

गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेला इस्रायल आणि हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज (दि.२५) त्यांनी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी नेतन्याहू म्‍हणाले की, "आता विजय आपल्या अगदी जवळ आला आहे. हमासवरील आमचा विजय इराणसाठी मोठा धक्का असेल. आमच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व पाऊल उचलू."

दहशतवाद्यांची पाठराखण करणार्‍यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे

दहशतवादाविरोधात अमेरिका आणि इस्रायलने एकत्र उभे राहायला हवे. आपण एकत्र उभे असतो आम्ही जिंकतो आणि दहशतवाद्यांचा पराभव होतो. ७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला करणाऱ्या पाठराखण करणार्‍या लोकांना स्वतःची लाज वाटली पाहिजे, असेही त्‍यांनी सुनावले. अमेरिकेतील बहुतांश लोक इस्रायलचे समर्थन करतात, हे असे लोक आहेत जे अमेरिकेच्‍या संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या लोकांप्रमाणे हमासच्या खोटेपणाला फसलेले नाहीत, असेही त्‍यांनी नमूद केले.

Israeli PM Benjamin Netanyahu
इस्रायलचा रफाहवर हवाई हल्‍ला, ३५ पॅलेस्टिनींसह हमास कमांडर ठार

पॅलेस्टिनींचे अन्न हमास चोरत आहे

४० हजारांहून अधिक मदत सामुग्रीचे ट्रक गाझामध्ये प्रवेश करण्यास इस्रायलनेपरवानगी दिली आहे. मात्र गाझामधील पॅलेस्टिनींना पुरेसे अन्न मिळत नाही कारण हमास पॅलेस्टिनींचे अन्न चोरत आहे. हमास पॅलेस्टिनी नागरिकांचे नुकसान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. पॅलेस्टिनी महिला आणि मुलांसाठी मानवी ढाल बनणे फायदेशीर असल्याचे हमासचाम्‍होरक्‍या फतिह हमाद म्‍हणतो. ते शाळा, रुग्णालये आणि मशिदींवर रॉकेट डागतात. जेव्हा ते युद्ध क्षेत्र सोडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते नागरिकांना गोळ्या घालतात, असेही त्‍यांनी सांगितले.

Israeli PM Benjamin Netanyahu
युद्ध : झळा इस्रायल-हमास युद्धाच्या

युद्धामध्‍ये नागरिकाचा मृत्यू ही इस्रायलसाठी शोकांतिका

युद्धामध्‍ये प्रत्येक नागरिकाचा मृत्यू ही इस्रायलसाठी शोकांतिका आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमात इस्रायलची बदनामी व्हावी, अशी हमासची रणनीती आहे. अनेक पॅलेस्टिनी नागरिकांचा युद्धामध्‍ये मृत्यू व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. ते युद्ध जिंकण्यापूर्वी इस्रायलवर दबाव आणू इच्छितात. ७ ऑक्टोबर २०२३ सारखाच इस्रायलवर पुन्‍हा हल्ला करण्याचा कट रचला जात आहे;पण मी तुम्हाला येथे सर्वांना ग्‍वाही देतो की, माझ्यावर कितीही दबाव आला तरी मी इस्रायलवर पुन्‍हा हमासचाहल्‍ला होवू देणार नाही. जोपर्यंत हमासचा पूर्णपणे नायनाट होत नाही तोपर्यंत युद्ध संपणार नाही, असा निर्धारही त्‍यांनी केला.

Israeli PM Benjamin Netanyahu
बहार विशेष : ‘हमास’च्या हल्ल्यामागे षड्यंत्र कुणाचे?

नेतान्याहू यांच्या अमेरिका भेटीला विरोध

इस्रायलच्या पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याच्या निषेध करत मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये हमासने पकडलेल्या ओलीसांच्या कुटुंबीयांनी निदर्शने केली. युद्ध गुन्ह्यांच्या आरोपाखाली नेतान्याहू यांना अटक करण्याची मागणी करत त्‍यांनी मोर्चा काढून त्‍यांनी निषेध केला. यावेळी मोर्चा काढण्‍याच्‍या प्रयत्‍नात असणार्‍या सुरक्षा दलाच्‍या कर्मचाऱ्यांनी अटक केली. यावेळी एका ओलिसांच्या नातेवाईकाने आरोप केला की, नेतान्याहू सत्तेत राहण्यासाठी युद्धविराम आणि ओलिसांची सुटका करण्याचा करार पुढे ढकलत आहेत.

Israeli PM Benjamin Netanyahu
युद्धकारण : कुठून मिळतो ‘हमास’ला पैसा?

डेमोक्रॅटिक पक्षाच्‍या अनेक नेत्‍यांचा नेतान्‍याहू यांच्‍या अमेरिका भेटीला विरोध

अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्‍या अनेक नेत्‍यांनीही नेतान्याहू यांच्या अमेरिका भेटीला विरोध केला आहे. काही खासदारांनी भाषणावर बहिष्कार टाकला. नेत्‍यान्‍याहू जेव्‍हा अमेरिकेच्‍या संसदेला संबोधित करत असतील तेव्‍हा आम्‍ही हमासने ओलीस ठेवलेल्या लोकांच्या कुटुंबियांशी चर्चा करु, असे त्‍यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news