इस्रायलच्‍या सैन्‍याचा गोळीबार, लेबनॉनमध्ये २२ निदर्शक ठार

Israel-Lebanon Conflict : १२४ हून अधिक जखमी, सैन्‍य माघारीसाठी द. लेबनॉनमध्‍ये निदर्शने
Israel-Lebanon Conflict
(Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्याने केलेल्‍या गोळीबारात २२ निदर्शक ठार झाले तर १२४ हून अधिक जखमी झाल्‍याचा दावा लेबनॉन आरोग्‍य मंत्रालयाने केल्‍याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. ( Israel-Lebanon Conflict ) मृतांमध्‍ये सहा महिलांचा समावेश आहे. सीमावर्ती २०हून अधिक गावांमधील लोक जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

इस्रायल-हिजबुल्लाह युद्धबंदीसाठी नोव्हेंबर २०२४च्या अखेरीस करार झाला हाेता. या करारानुसार इस्रायली सैन्याला ६० दिवसांमध्‍ये दक्षिण लेबनॉनमधून माघार घ्यावी लागणार होती; परंतु अजूनही इस्‍त्रायली सैन्‍य दक्षिण लेबनॉनमध्‍ये कायम आहे. याच्‍या निषेधार्थ दक्षिण लेबनॉनमधील २० हून अधिक गावातील नागरिक रस्‍त्‍यावर उतरले. त्‍यांनी हिजबुल्लाहचे झेंडे हाती घेवून इस्‍त्रायली सैन्‍याचा निषेध केला. यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्‍यासाठी केलेल्‍या गोळीबारात २२ आंदोलक ठार झाले. यामध्‍ये सहा महिलांसह लेबनॉनच्‍या एक सैनिकाचाही समावेश असल्‍याचे आरोग्‍य मंत्रालयाने म्‍हटलं आहे.

निदर्शकांना हिजबुल्‍लाहाने भडकवल्‍याने गाेळीबार : इस्रायलचा दावा

दक्षिण लेबनॉनमध्‍ये हिजबुल्लाह पुन्‍हा एकदा सक्रीय होताना दिसत आहे. तसेच यावर कारवाई करण्‍यासाठी लेबनॉन सरकारने अनेक भागात आपले सैन्‍य तैनात केलेले नाही. आता हिजबुल्लाहवर नियंत्रणासाठी इस्रायली सैन्याला तेथे जास्त काळ राहण्याची आवश्यकता आहे. तर इस्रायली सैन्य पूर्णपणे माघार घेत नाही तोपर्यंत तेथील संरक्षणाची जबाबदारी आम्‍ही घेवू शकत नाही, असे लॅबनॉन सैन्‍याने म्‍हटलं आहे. रविवारी झालेल्‍या गोळीबारास इस्‍त्रायलने हिजबुल्लाहला दोषी ठरवले आहे. इस्रायली लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, दक्षिण लेबनॉनमध्‍ये निदर्शनावेळी आम्‍हाला अनेक ठिकाणी संशयितांची दहशतवाद्‍यांची उपस्थिती आढळून आली. जमावााला भडकवले जात होते. जमाव बेकाबू झाल्‍यानंतर गोळीबार करण्‍यात आला. हिंसाचार घडवून आणण्‍याच्‍या प्रयत्‍नात असलेल्‍या संशयितांना अटक केली असून, त्यांची चौकशी केली जात आहे.

लेबनॉनच्या सार्वभौमत्वाशी तडजोड नाही: अध्यक्ष जोसेफ

लेबनॉनचे अध्‍यक्ष जोसेफ आऊन यांनी रविवारी दक्षिण लेबनॉनच्या लोकांना संबोधित केले. ते म्‍हणाले, लेबनॉनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. देशातील नागरिकांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी मी उच्च पातळीवर या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news