Israel Gaza attack | गाझामध्ये इस्रायली हल्ल्यांचे सत्र; 29 पॅलेस्टिनींचा मृत्यू

युद्धविरामानंतरचा सर्वात मोठा हल्ला
Israel Gaza attack
Israel Gaza attack | गाझामध्ये इस्रायली हल्ल्यांचे सत्र; 29 पॅलेस्टिनींचा मृत्यूPudhari File photo
Published on
Updated on

डेर अल-बाला (गाझा पट्टी); पीटीआय : गाझामधील विविध रुग्णालयांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये किमान 29 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये युद्ध थांबवण्यासाठी झालेल्या युद्धविरामानंतरचा हा सर्वाधिक मृतांचा आकडा असल्याचे मानले जात आहे.

हमासने पुन्हा एकदा युद्धविरामाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप इस्रायलने शुक्रवारी केला होता. या आरोपानंतर अवघ्या एका दिवसात इस्रायलने संपूर्ण गाझा पट्टीत भीषण हल्ले चढवले. यामध्ये निर्वासितांच्या तंबूंना, एका निवासी इमारतीला आणि एका पोलिस ठाण्याला लक्ष्य करण्यात आले. विशेष म्हणजे, इजिप्तच्या सीमेला लागून असलेले राफा क्रॉसिंग रविवारी पुन्हा सुरू होणार आहे. गेल्या वर्षी युद्ध संपवण्याच्या मार्गातील एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या कराराकडे पाहिले जात होते. मात्र, सीमा उघडण्याच्या नेमक्या एक दिवस आधी हे हल्ले झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news