Israel airstrike Iran | इस्रायलचे 50 लढाऊ विमानांनी इराणवर हल्ले

शस्त्रास्त्र निर्मिती कारखाने, हेवी वॉटर न्यूक्लियर कॉम्प्लेक्स लक्ष्य केल्याचा दावा
Israel airstrike Iran |
Israel airstrike Iran | इस्रायलचे 50 लढाऊ विमानांनी इराणवर हल्ले
Published on
Updated on

तेल अवीव/तेहरान; वृत्तसंस्था : इस्रायलने इराणच्या हद्दीत शिरून 50 लढाऊ विमानांच्या साहाय्याने भीषण हल्ला केला. इस्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री इराणमधील तीन भागांतील शस्त्रनिर्मिती कारखाने आणि अणू कार्यक्रमाशी संबंधित तळांना लक्ष्य करण्यात आले.

हे हल्ले गुप्तचर माहितीच्या आधारावर करण्यात आले असून, ते अनेक तास सुरू होते. या हल्ल्यांमध्ये अराक आणि यज्द सारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश होता. ज्या ठिकाणांवर हल्ले झाले, त्यात लष्करी शस्त्रास्त्र उद्योग आणि बॅलिस्टिकसह अँटी-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रांचे सुटे भाग बनवणार्‍या कारखान्यांचा समावेश आहे. याशिवाय, अराकमधील हेवी वॉटर प्लांटवरही हल्ला करण्यात आला. इस्रायलच्या मते, हा प्रकल्प अण्वस्त्रांसाठी प्लुटोनियम तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. तसेच, यज्दमधील त्या प्लांटलाही लक्ष्य करण्यात आले, जिथे युरेनियम संवर्धनासाठी आवश्यक स्फोटक सामग्री तयार केली जाते.

द जेरूसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, शुक्रवारी इस्रायलने अराकमधील इराणच्या खांडब हेवी वॉटर अणुभट्टीवर, तसेच अर्दाकानमधील युरेनियम संवर्धन सुविधेवर हल्ला केला. इस्रायली संरक्षण दला (आयडीएफ)ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सौदी अरेबियावरील हल्ल्यात 15 अमेरिकन सैनिक जखमी

दुसरीकडे, इराणने सौदी अरेबियातील प्रिन्स सुल्तान एअरबेसवर शुक्रवारी रात्री 6 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 29 ड्रोन डागले. या हल्ल्यात किमान 15 अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news