Israel Iran Conflict: शाळेवरील हल्ल्यातील 165 मृतांचे सामुदायिक दफन

नातेवाईकांकडून अमेरिका-इस्रायलविरोधात संताप
Israel Iran Conflict
Israel Iran Conflict
Published on
Updated on

जिनिव्हा/तेहरान ः इराणच्या दक्षिणेकडील मिनाब शहरात एका मुलींच्या शाळेवर झालेल्या भीषण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 165 जणांवर मंगळवारी सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांत बहुतांश शाळकरी मुली आहेत.

या शाळेवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने जगभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची तातडीने, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने केले आहे. हा हल्ला कोणी केला, याबाबत स्पष्टपणे कोणाचेही नाव न घेता, ज्या दलांनी हा हल्ला केला आहे त्यांनीच याची जबाबदारी स्वीकारून सत्य समोर आणावे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. दरम्यान, या सर्व मृतांचे सामुदायिक दफन करण्यात आले.

विनाश आणि क्रूरतेचा कळस

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कार्यालयाच्या प्रवक्त्या रविना शामदासानी यांनी जिनिव्हा येथील पत्रकार परिषदेत या घटनेचा तीव्र निषेध केला. त्या म्हणाल्या, ‌‘ही घटना अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक आहे. सोशल मीडियावर फिरत असलेली या हल्ल्याची चित्रे विनाश, निराशा आणि क्रूरतेचे दर्शन घडवतात.‌’ इराणने हा युद्ध गुन्हा असल्याचे सांगून आंतरराष्ट्रीय समुदायाकडे न्यायाची मागणी केली आहे, तर अमेरिकन सैन्याने कधीही जाणूनबुजून शाळा किंवा नागरी भागाला लक्ष्य केलेले नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news