Israel Hezbollah conflict | इस्रायल-हिजबुल्ला संघर्ष तीव्र; हल्ले-प्रतिहल्ले सुरूच

लेबनॉनमध्ये युद्धबळींची संख्या 357 वर
Israel Hezbollah conflict |
Israel Hezbollah conflict | इस्रायल-हिजबुल्ला संघर्ष तीव्र; हल्ले-प्रतिहल्ले सुरूचPudhari File Photo
Published on
Updated on

बेरुत; वृत्तसंस्था : लेबनॉनमधील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. इस्रायली तळ आणि सैनिकांना लक्ष्य करून रॉकेट, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे अनेक हल्ले केले आहेत. या हल्ल्यांत इस्रायलचे लष्करी तळ, रणगाडे आणि सैनिकांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे. प्रत्युत्तरादाखल इस्रायलकडूनही सातत्याने हल्ले केले जात आहेत.

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या इस्रायली हल्ल्यांतील मृतांची संख्या वाढून 357 झाली आहे. ती आधी 303 सांगण्यात आली होती. या हल्ल्यांत 1,223 लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे, इस्रायलने दावा केला आहे की त्यांनी या हल्ल्यांत 180 दहशतवाद्यांना ठार केले आहे. इस्रायली सैन्यानुसार, त्यांनी लेबनॉनमधील हिजबुल्लाची 4,300 हून अधिक ठिकाणे नष्ट केली आहेत.

हिजबुल्लासोबत युद्धबंदी चर्चा नाही

दरम्यान, लेबनॉनमधील हिजबुल्ला या कट्टरतावादी संघटनेसोबत युद्धबंदीबाबत कोणतीही चर्चा करणार नाही, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे.

हिजबुल्लाचा इस्रायली सैनिकांवर हल्ला

हिजबुल्लाने इस्रायली सैनिकांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, दक्षिण लेबनॉनमधील टायर येथे एका घरात असलेल्या इस्रायली सैनिकांवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला शनिवारी मध्यरात्री साधारण 1 वाजून 40 मिनिटांनी झाला. हिजबुल्लाने सांगितले की, त्यांनी मध्यरात्रीनंतर इस्रायलच्या किरयात शमोना, मेटुला आणि मिसगव आम या भागांवर रॉकेट हल्ले केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news