

इस्रायल-हमास युद्धास सोमवारी (ता. 7) वर्ष पूर्ण होत आहे. या युद्धात 42 हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून शेकडोजणांना ओलिस ठेवण्यात आले आहे. युद्धाची धग कायम असल्याने पॅलेस्टाईनसह जगातील अन्य देशांतून युद्धबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. या युद्धाच्या वर्षपूर्तीनिमित्त 21 व्या शतकातील युद्धांचा थोडक्यात आढावा...
2014 मध्ये दोन्ही देशांत संघर्षाची पहिली ठिणगी पडली होती. 2022 पासून युद्धास प्रारंभ झाला. या युद्धात मोठी हानी झाली असून अद्याप युद्ध सुरूच आहे.
अल कायदाविरोधात अमेरिकेने युद्ध पुकारले होते. यात अफगाणिस्तानातील 30 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. 30 ऑगस्ट 2021 रोजी युद्धसमाप्ती जाहीर केली होती.
इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांची राजवट उलथावून टाकण्यासाठी अमेरिकेने इराकवर हल्ला केला होता. हुसेन यांना ठार केल्यानंतर युद्धसमाप्ती करण्यात आली.
सीरिया आणि येमेन या ठिकाणी सत्ताधारी राष्ट्राध्यक्षांविरोधात बंडखोरांनी पुकारलेल्या युद्धात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. दोन्ही देशांमधील गृहयुद्ध अद्यापही सुरूच आहे.
हमासने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला होता. यानंतर इस्रायलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली होती.
हमासच्या हल्ल्यात इस्रायलमधील 1200 नागरिकांचा मृत्यू झाला होता. इस्रायलमधील 250 लोकांना हमासने ओलिस ठेवले होते.
येमेनमधील हुथी बंडखोरांनी या यद्धात उडी घेतली असून लाल समुद्रातून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. हुथी बंडखोरांचे इराणशी लागेबांधे आहेत.
युद्धानंतर 48 दिवसांनंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईनने चार दिवसांची शस्त्रसंधी केली होती. यादरम्यान काही ओलिसांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा युद्ध सुरू आहे.
जून महिन्यात संयुक्त राष्ट्रात इस्रायल-हमास शस्त्रसंधीबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामीन नेतान्याहू यांनी मात्र या ठरावाबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही वेस्ट बँक, जेरूसलेममधील सैन्य इस्रायलने त्वरित मागे घेण्याबाबत निर्वाळा दिला आहे.
18 सप्टेंबर रोजी पेजर आणि वॉकीटॉकीच्या माध्यमातून घडवलेल्या स्फोटात लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांसह शेकडोजणांचा मृत्यू झाला. हा हल्ला मोसाद या इस्रायली गुप्तचर संस्थेने घडवून आणल्याचा दावा लेबनॉनने केला आहे.