

पुढारी ऑनलाईन डेस्क : युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीमध्ये बॉम्ब टाकले आहेत. यामध्ये कमीत कमी ११३ पॅलेस्टाईन नागरिक ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये २८ लहान मुले, ३१ महिलांचा समावेश आहे. अल जजिरा या वृत्त वाहिनेने याबाबत वृत्त दिले आहे. रविवार १९ डिसेंबर पासून युद्धबंदी होणार आहे. त्यापूर्वीच इस्रायलने हा हल्ला केला आहे. अल जजिरा या वृत्तवाहिनेने ही बातमी दिली आहे.
इस्रायलने युद्धबंदी सुरु होण्यापूर्वीच हा हल्ला केला आहे. त्यांनी आपल्या कारवाया गतिशिल केल्या आहेत. यामध्ये गेल्या २४ तासात ५० ठिकाणांवर बॉम्ब टाकण्यात आले आहेत. दरम्यान आतापर्यंत झालेल्या इस्त्रायल हमास युद्धात ४६ हजार पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. तर १ लाख १० हजारांवर जखमी झाले आहेत. पहिल्यांदा जेव्हा ७ ऑक्टोबर २०२३ ला हमास ने इस्रायलवर हल्ला केला होता त्यावेळी ११३९ इस्रायली नागरिक मारले गेले होते व २०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.
दरम्यान पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या ऑफिसने सांगितले की युद्धकैद्यांना सोडण्याचा प्रस्तावावर विचार झाला असून दोन्ही गटांनी यावर सहमती दर्शवली आहे. तर इस्रायल, हमास यांच्याबरोबर अमेरिका व कतारच्या प्रतिनिधींनी दोहा शहरात झालेल्या प्रस्तावावर सही केली आहे.