पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणने इस्रायलावर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष आता आणखी तीव्र होणार असल्याचे संकेट मिळत आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना इस्रायलने नॉन ग्राटा (अशी व्यक्ती जिला कोणताही आदर किंवा स्वागत होणार नाही) म्हणून घोषित केले आहे.त्यांना देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. ( Iran-Israel conflict)
इस्रायली लष्कराने लेबनॉनमध्ये घुसून हिजबुल्लाहच्या सैनिकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. यानंतर इराणने इस्त्रालयवर १८०हून अधिक क्षेपणास्त्र डागली. या दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री कॅट्झ यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "जो कोणी इराणच्या इस्रायलवरील गुन्हेगारी हल्ल्याचा निःसंदिग्धपणे निषेध करू शकत नाही, तो इस्रायलच्या भूमीवर पाय ठेवण्याच्या लायकीचा नाही. हे (गुटेरेस) दहशतवादी, बलात्कारी आणि खुन्यांना पाठिंबा देणारे गुटेरेस आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासावर एक डाग म्हणून स्मरणात ठेवले आहे." ( Iran-Israel conflict)
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर भ्याड हल्ला केला. यावेळी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी याचा निषेध केला नाही. तसेच हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. हमास, हिजबुल्लाह, हुथी आणि आता इराण दहशतवाद्यांना, बलात्काऱ्यांना आणि खुनींना पाठिंबा देणारा महासचिव संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासावर एक डाग म्हणून स्मरणात राहील. इस्रायल आपल्या नागरिकांचे संरक्षण आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा राखणे सुरू ठेवेल, असेही इस्त्रायलने स्पष्ट केले आहे. ( Iran-Israel conflict)
इराणच्या गुप्तचर मंत्रालयाने इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेडची यादी जाहीर केली आहे. गुप्तचर संस्थेने हिब्रूमध्ये जारी केलेल्या धमकीमध्ये, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांचे इतर प्रमुख संरक्षण अधिकारी संपवले जातील. नेतन्याहू यांचे नाव छायाचित्रासह यादीत पहिल्या तीनमध्ये आहे, त्यानंतर संरक्षण मंत्री योव गॅलांट आणि लष्करप्रमुख हर्झी हालेवी यांचे नाव आहे. ( Iran-Israel conflict)
इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने लेबनॉनवर हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायलने मागील १२ तासांमध्ये सहाव्यांदा बेरूतवर हल्ला केला . त्याचवेळी इस्रायलने जमिनीवर हल्ला करण्यासाठी लेबनॉनमध्ये आणखी सैन्य पाठवण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, इस्रायलच्या लेबनॉनच्या सीमेवर हिजबुल्लाहच्या सैनिकांशी झालेल्या चकमकीत दोन इस्रायली सैनिक ठार झाले असून १८ जखमी झाले आहेत. ( Iran-Israel conflict)