पुढारी ऑनलाईन डेस्क : "शत्रू ज्यू राजवट असो की, अमेरिका त्यांना आता निश्चितच जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल." अशा शब्दांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांनी आज (दि.२) धमकी दिल्याचे वृत्त 'एपी'ने दिले आहे. त्यांच्या या विधानामुळे मध्यपूर्वेतील रक्तसंघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इराणच्या माध्यमांनी अयातुल्लाह खोमेनी यांचा एक व्हिडिओ प्रसारी केला आहे. यामध्य ते म्हणत आहेत की, इराणाचा शत्रू ज्यू राजवट असो की अमेरिका जे कोणती इराणविरोधात कारवाई करतील त्यांना निश्चितच सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. मात्र इराण केव्हा प्रत्त्युत्तर देणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
इस्त्रालयने २६ ऑक्टोबर रोजी इराणच्या लष्करी तळावर हवाई हल्ला केला होता. यामध्ये पाच जण ठार झाले होते. इराणच्या आण्विक आणि तेल पायाभूत सुविधांवरील कारवाई आम्ही टाळली. केवळ लष्करी तळावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलच्या अधिकार्यांनी केला होता. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यास हे प्रतित्युर असल्याचेही म्हटलं होतं. दरम्यान, यापूर्वी खोमेनी यांनी इस्त्रायलच्या हल्ल्यांकडे अतिशोक्ती किंवा कमी लेखले जाऊ नये, असे म्हटले होते. यानंतर आता त्यांनी इराण आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवरील हल्ल्यांबद्दल इस्रायल आणि अमेरिका या दोघांनाही जोरदार प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीला काही दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. यापूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांनी धमक् दिल्याने मोठ्या संघर्षाची शक्यता वर्तवली जावू लागली आहे.