Iran warning Israel US | जमिनीवरून हल्ला केल्यास नि:पात करू; इराणचा इस्रायल, अमेरिकेला इशारा

Iran warning Israel US |
Iran warning Israel US | जमिनीवरून हल्ला केल्यास नि:पात करू; इराणचा इस्रायल, अमेरिकेला इशारा
Published on
Updated on

तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इस्रायलच्या प्रत्येक हालचालीवर आमची बारीक नजर आहे. त्यांच्याकडून जमिनीवरील (ग्राऊंड अटॅक) हल्ले झाल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांचा कदापि टिकाव लागणार नाही. त्यांचा नि:पात करू, असा इशारा इराणने दिला आहे.

इराणचे लष्करप्रमुख अमीर हातामी म्हणाले की, शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर आमचे लक्ष असून लष्कर सज्ज आहे. जमिनीवरून हल्ला झाला तर हल्लेखोरांना सोडणार नाही. हातामी यांनी लष्करी अधिकार्‍यांना शत्रूची रणनीती ओळखून आधीच प्रत्युत्तराची योजना तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत त्वरित कारवाई करता येईल. अमेरिकेकडून जमिनीवरील लष्करी कारवाईची शक्यता वर्तवली जात असताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

शत्रूने आम्हाला हलक्यात घेतले

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणचे सामर्थ्य हलक्यात घेतले. येणार्‍या दिवसांत यापेक्षा मोठे आणि अधिक धोकादायक हल्ले केले जातील, असा इशारा इराणच्या लष्करी मुख्यालयाचे प्रवक्तेइब्राहिम झाल्फगारी यांनी दिला आहे. जोपर्यंत अमेरिका आणि इस्रायलला कायमचा पश्चाताप होत नाही, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news