Iran Uses Starlink US Military Attacks | अमेरिकन सैन्यावरील हल्ल्यांसाठी इराणकडून ‘स्टारलिंक’चा वापर

Iran Uses Starlink US Military Attacks  |
Iran Uses Starlink US Military Attacks | अमेरिकन सैन्यावरील हल्ल्यांसाठी इराणकडून ‘स्टारलिंक’चा वापर
Published on: 
Updated on: 

सॅन फ्रान्सिस्को; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, प्रत्युत्तरादाखल इराणी लष्कराने अमेरिकन सैन्यावरील हल्ल्यांसाठी एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीच्या ‘स्टारलिंक’ सॅटेलाईट इंटरनेट सेवेचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इराणने अमेरिकन सैन्याविरोधात स्टारलिंकचा दोनदा अनधिकृत वापर केल्याचे अंतर्गत तपासात समोर येताच स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क संतापले. याशिवाय, अमेरिकन लष्करानेही स्टारलिंकच्‍या ‘स्टारशील्ड’चा वापर ‘वन-वे ड्रोन्स’ उडवण्यासाठी केला, मात्र त्यासाठी केवळ जमिनीवरील कारवायांसाठी असलेला स्वस्त प्लॅन वापरल्याचे मस्क यांना समजले.

पेंटागॉनचा गुप्त अहवाल

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांना इराणी लष्कराच्या स्टारलिंक वापराबाबत अहवाल सादर केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. मात्र, अशा कोणत्याही अहवालाची माहिती नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिकन संरक्षण विभागाने दिले आहे.

१) अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकन सैन्याविरुद्ध स्पेसएक्सच्या ‘स्टारलिंक’ सॅटेलाईट इंटरनेटचा अनधिकृत वापर केला.

२) या प्रकारामुळे स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क प्रचंड संतापले असून अमेरिकन लष्कराच्या ‘स्टारशील्ड’ वापरावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

३) अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांना या संदर्भात एक गुप्त अहवाल सादर करण्यात आला आहे.

४) इराणमध्ये अधिकृत परवाना नसतानाही तस्करीद्वारे आलेल्या हजारो स्टारलिंक टर्मिनल्समुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.