Hormuz Crisis |इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींचा राष्‍ट्राला पहिला संदेश; होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याबाबत मोठे विधान

देशाला दिलेल्‍या पहिल्‍या सार्वजनिक संदेशातील इशार्‍याने तेल बाजारात मोठी खळबळ
Iran Supreme Leader Mojtaba Khamenei first message
प्रातिनिधिक छायाचित्रfile photo.
Published on
Updated on

Iran Supreme Leader Mojtaba Khamenei first message

तेहरान : अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या दरम्यान, इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजताबा खामेनी यांनी आपले पहिले निवेदन प्रसिद्ध केले आहे. आज (दि. १२) सरकारी टीव्‍हीवर एका वृत्त निवेदकाने त्‍यांचे हे निवेदन वाचून दाखवले. खामेनी स्वतः कॅमेऱ्यासमोर आले नाहीत, मात्र त्यांचे हे पत्रक देशभर प्रसारित करण्यात आले आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याचा दिला इशारा

या निवेदनात मोजतबा खामेनी यांनी म्हटले आहे की, 'होर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) बंद करण्‍याचा निर्णय हा शक्तीप्रदर्शन म्हणून वापरले जावे. खाडीतील अरब शेजारी देशांवरील हल्ले सुरूच राहतील, असेही त्यांनी नमूद केले. पश्चिम आशियातील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत त्यांनी दिलेला हा पहिलाच संदेश आहे.

Iran Supreme Leader Mojtaba Khamenei first message
Iran Conflict | समुद्रात तुमची 'दादागिरी' चालणार नाही! इराणविरोधात भारत,पाकिस्‍तानसह १३५ देश एकवटले

पहिल्‍याच संदेशातील इशार्‍याने तेल बाजारात मोठी खळबळ

पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी सरकारी टेलिव्हिजनवरून प्रसारित झालेला हा त्यांचा पहिला सार्वजनिक संदेश होता. इराणकडून पर्शियन आखातातील जहाज वाहतूक आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांमुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर खामेनी खामेनेईंचे हे विधान आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचे दर पुन्हा एकदा प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर पोहोचले आहेत.

Iran Supreme Leader Mojtaba Khamenei first message
LPG Crisis Debate|संसदेत LPG संकटावर चर्चा, राहुल गांधींनी व्‍यक्‍त केली 'भीती'; पेट्रोलियन मंत्री पुरींनी दिले प्रत्युत्तर

खामेनी यांनी केले राष्ट्रीय एकतेचे आवाहन

आपल्या भाषणात राष्ट्राला संबोधित करताना मोहम्मद मोजतबा खामेनी यांनी राष्ट्रीय एकतेचे आवाहन केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "शत्रूंवर दबाव आणण्यासाठी होर्मुजची सामुद्रधुनी बंद ठेवली जाईल." हे जलमार्ग बंद ठेवणे हे इराणच्या विरोधकांना रोखण्याचे एक प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी शेजारील देशांशी मैत्रीपूर्ण संबंधांवर भर दिला असला, तरी अमेरिकन तळांना लक्ष्य करण्याचे धोरण कायम ठेवणार असल्याचेही स्पष्ट केले.

Iran Supreme Leader Mojtaba Khamenei first message
Israel Iran conflict | 'इस्लामिक रिव्होल्युशनरी'चा कमांडर ठार, इराणच्‍या ‘तालेघन’ अणू केंद्रावरही हल्ला : इस्रायलचा दावा

अमेरिकन लष्करी तळांना इशारा

भाषणादरम्यान खामेनी यांनी या प्रदेशातील सर्व अमेरिकन लष्करी तळ तात्काळ बंद करण्याची मागणी केली. जर हे तळ हटवले नाहीत, तर त्यांच्यावर हल्ले केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला. इराणचे धोरण केवळ अमेरिकन तळांना लक्ष्य करण्याचे आहे आणि त्यात कोणताही बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचलेला असताना आणि तेलाच्या किमतीत मोठी वाढ होत असताना आलेल्या या कडक भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता अधिकच वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news