इराणच्या आण्विक स्थळांवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत

इराण सरकारच्या अनेक सेवांवर परिणाम
iran is experiencing a massive cyber attack especially on its nuclear facilities
इराणच्या आण्विक स्थळांवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीतFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेल्‍या तणावात एक धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. आज (शनिवार) इराणच्या आण्विक ठिकाणांसहीत अनेक अस्‍थापनांवर एकाचवेळी सायबर हल्‍ले झाल्‍याचे समोर आले आहे. या हल्‍ल्‍यामुळे सरकारच्या अनेक सेवांवर परिणाम झालेला आहे. ईराणकडून करण्यात आलेल्‍या हल्‍ल्‍याला उत्‍तर म्‍हणून इस्रायलकडून हा हल्‍ला करण्याच्या दिशेने पहिले पाउल असल्‍याचे म्‍हटले जात आहे.

यावेळी सायबर हल्‍ल्‍यामध्ये इराणच्या आण्विक अस्‍थापनांना देखील लक्ष्य करण्यात आले. हा हल्‍ला अशावेळी करण्यात येत आहे जेंव्हा १ ऑक्‍टोबरला इराणच्या क्षेपणास्‍त्र हल्‍ल्‍याच्या विरोधात इस्रायलने प्रतिहल्‍ला करण्याचा इशारा दिला होता.

इराणच्या प्रत्येक सेक्टरवर झाले हल्ले

इराणच्या सर्वोच्च सायबर सुरक्षा परिषदेचे माजी सचिव फिरोजाबादी यांनी जाहीर केले की न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि कार्यपालिका यासह इराणच्या जवळपास सर्व सरकारी दलांना गंभीर सायबर हल्ले आणि माहिती चोरीचा सामना करावा लागला आहे.

ते म्हणाले, "आमच्या अणु प्रकल्पांवर तसेच इंधन वितरण, नगरपालिका सेवा, वाहतूक आणि बंदरे यासारख्या गंभीर नेटवर्कवरही सायबर हल्ला झाला आहे. या घटना देशभर पसरलेल्या अनेक क्षेत्रांचा एक छोटासा भाग आहेत."

इस्रायलने दिला होता इशारा

या आधी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी बुधवारी इशारा दिला होता की, नुकत्‍याच झालेल्‍या इराणी क्षेपणास्‍त्र हल्‍ल्‍याचे उत्‍तर लवकरच देण्यात येईल. ते म्हणाले की, त्यांच्या देशाचा बदला “घातक” आणि “आश्चर्यजनक” असेल. उत्तर गाझा नंतर इस्रायलने आता लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या आक्रमकांविरूद्ध जमिनीवरून हल्ला चढवला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news