Iran US War | अमेरिकन लढाऊ एफ-35 पाडले : इराण

Iran US War |
Iran US War | अमेरिकन लढाऊ एफ-35 पाडले : इराण
Published on
Updated on

तेहरान; वृत्तसंस्था : इराणच्या सरकारी माध्यमांनी शुक्रवारी काही छायाचित्रे प्रसिद्ध करत अमेरिकेचे अत्याधुनिक एफ-35 स्टेल्थ लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने मध्य इराणमध्ये हे विमान पाडल्याचे म्हटले आहे. मात्र, या छायाचित्रांतील अवशेषांबाबत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत.

प्रसारित केलेल्या छायाचित्रांमध्ये विमानाचे छोटे-छोटे तुकडे दिसतात. त्यातील सर्वात मोठा भाग साधारण एका व्यक्तीच्या उंचीइतका असल्याचे दिसते. इराणी माध्यमांनी हे अवशेष-35 चे असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात ते दुसर्‍याच प्रकारच्या विमानाचे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे एफ-15 चे अवशेष असू शकतात

लष्करी तज्ज्ञांच्या मते, छायाचित्रांतील काही चिन्हे आणि रचना पाहता हे अवशेष अमेरिकेच्या एफ-15 लढाऊ विमानाशी जुळतात. विशेषतः, ‘यूएस एअर फोर्स इन युरोप असा अंशतः दिसणारा लोगो आणि लाल-पांढर्‍या पट्ट्यांची खूण ही एफ-15 विमानाच्या टेल फिनवर आढळणारी वैशिष्ट्ये आहेत. तसेच, त्याचा काही भाग-15 च्या इंजिनजवळील संरचनेशी सुसंगत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे इराणचा एफ-35 पाडल्याचा दावा अधिकच संशयास्पद ठरत आहे.

पायलटचा पत्ता नाही; इराणचा दावा कायम

इराणच्या प्रेस टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, विमान पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे पायलटचे भवितव्य अद्याप अज्ञात आहे. लष्कराने या कारवाईला मोठे यश असल्याचे सांगितले आहे. याआधीही इराणने होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे एक ‘अत्याधुनिक शत्रू विमान’ पाडल्याचा दावा केला होता. मात्र, त्यावेळी कोणतेही छायाचित्र किंवा पुरावा सादर करण्यात आले नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news