Iran attacks Israel 2026: ७० बॅलिस्टिक मिसाईलसह इराणाचा पलटवार... तेल अविवमधील सायरन काही थांबेनात; इस्त्रायलसह ७ देशांत हल्ले

Iran attacks Israel 2026
Iran attacks Israel 2026pudhari photo
Published on
Updated on

Iran attacks Israel 2026: इराण आणि इस्त्रायल यांच्यात लष्करी संघर्ष सुरू झाला असून इस्त्रायलने अमेरिकेच्या मदतीनं इराणवर एअर स्ट्राईक करून थेट राजधानी तेहरानला टार्गेट केलं. इस्त्रायलनं इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खुमैनी यांच्या कार्यालयाजवळच हा हल्ला केला. आता इराणने देखील इस्त्रायलवर पलटवार केला आहे. इराणने इस्त्रायलवर ७० बॅलेस्टिक मिसाईल दागले. त्यामुळं इस्त्रायलमध्ये अलर्ट अॅक्टिव्हेट करण्यात आला आहे.

इराणने फक्त इस्त्रायलवर हल्ला केला नसून तब्बल ७ देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला आहे. यात बहरीन, कतार, युएई, सैदी अरेबिया, जॉर्डन, कुवैत या देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर देखील हल्ला करण्यात आला आहे.

इराणच्या मिसाईलच्या रडारवर इस्त्रायलची येरूशलम, हायफा आणि शेफेल्लाह ही शहर होती. येरुशलममध्ये सध्या सायरन वाजत आहे. लोकांना बॉम्ब विरोधी शेल्टरमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. याचबरोबर मिळालेल्या ताज्या माहितीनुसार इराणने दुसऱ्यांदा इस्त्रायलवर मिसाईलची दुसरी खेप डागली, इस्त्रायल आपल्या पूर्ण क्षमतेनं इराणची क्षेपणास्त्रे पाडत आहे.

उत्तर इस्त्रायलमध्ये अनेक स्फोटांचे आवाज आले आहेत. इस्त्रायलने आपली अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टम अॅक्टिव्हेट केली आहे. इस्त्रायलनं संपूर्ण देशात आपत्कालीन स्थिती घोषित केली आहे. संपूर्ण इस्त्रायलमध्ये सायरन वाजत आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला गेला आहे.

इस्त्रायल डिफेन्स फोर्सने सांगितलं की इराणमधून इस्त्रायकडे लाँच केलेली मिसाईलची ओळख पटलवी होती. त्याचा धोका कमी करण्यासाठी डिफेन्स सिस्टम काम करत आहे. गेल्या काही मिनिटात आम्ही होम फ्रंट कमांडने संबंधित भागात मोबाईलवर सावध राहण्याचा इशारा देणारे निर्देश दिले आहेत.

इराणचे मिसाईल इंटरसेप्ट करण्यासाठी इस्त्रायलकडून डिफेन्स सिस्टम अॅक्टिव्ह करण्यात आली आहे. इस्त्रायली मॅगन डेविड एडोम एम्बुलन्स सर्व्हिसने सांगितलं की उत्तरी इस्त्रायलवर इराणने बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला केला आहे. यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. या भागात किमान २ मिसाईल सोडण्यात आली होती. एक मिसाईल मोकळ्या जागेत पडल्याचे वृत्त आहे. सरकारनं ज्या इस्त्रायली नागरिकांना अलर्ट मिळत आहे त्यांनी बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news