

India Energy Crisis: जगभरात सुरू असलेल्या उर्जा संकट काळात भारताच्या दृष्टीकोणातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. इराणने हार्मुझ सामुद्रधुनीमधून कोणतेही तेल वाहू जहाज जाऊ देणार नाही असा इशारा दिला असला इराणनं हार्मुझ सामुद्रधुनीमधून भारतीय ध्वज असलेले तेलाचे टँकर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारताचे पराराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरगची यांच्यातील चर्चेनंतर झाल्याचे सूत्रांकडून कळते आहे.
दरम्यान, भारताचे किमान दोन तेल वाहून नेणारी जहाजे पुषक्र आणि परिमल हे हार्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित पास झाले आहेत. या सामुद्रधुनीतून अमेरिका, युरोप आणि इस्त्रायल यांचे तेल वाहू टँकर्स पास होण्यावर निर्बंध आले आहेत.
इराणने हार्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जल वाहतूकीवर मोठी बंधने घातली आहेत. ही बंधने अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यासोबत सुरू असलेल्या लष्करी संघर्षानंतर घालण्यात आली आहेत.
इराणच्या समुद्र किनाऱ्या लागून असलेल्या या सामुद्रधुनीमधून दररोज जवळपास २० मिलियन बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते. जागतिक तेल खपतीचा हा पाचवा भाग आहे. तर सुमद्रामार्गे तेलाच्या होणाऱ्या वाहतुकीच्या एक तृतीयांश वाहतूक ही या मार्गेच होते.
त्यामुळं जगाच्या दृष्टीकोणातून हार्मुझ सामुद्रधुनी ही अत्यंत महत्वाची आहे. कारण जगातील मोठ्या प्रमाणावर लिक्विफाईड नैसर्गिक गॅसची वाहतूक देखील याच सामुद्रधुनीतून होते. इथं काही गडबड झाली तर जागतिक अर्थव्यवस्था आणि सप्लाय चेन, प्रत्येक घराचं बजेट कोलमडतं.