Iran Activated Code 100: काहीतरी मोठं होणार? इराणकडून Code 100 जारी, संपूर्ण देशात हाय अलर्ट; सैन्याला तयार राहण्याचे आदेश

कोड १०० जारी केला असून इराणच्या सशस्त्र दलाच्या सर्व शाखांना अॅक्टिव्ह केलं आहे.
Iran Activated Code 100
Iran Activated Code 100pudhari
Published on: 
Updated on: 

Iran Activated Code 100: संपूर्ण पश्चिम आशियात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इराणने आपल्या सर्व सशस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवलं आहे. त्यांनी कोड १०० जारी केला असून इराणच्या सशस्त्र दलाच्या सर्व शाखांना अॅक्टिव्ह केलं आहे. यात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर्प्स, सामान्य लष्कर, हवाई दल आणि अंतर्गत सुरक्षा पाहणाऱ्या सर्वांना संभाव्य लष्करी कारवाईसाठी सज्ज राहण्यास सांगितलं आहे.

नेमकं काय घडतंय?

आठवड्याच्या शेवटी काही अशा अचानक घटना घडल्या आहेत ज्यामुळे इराणने हा हाय अलर्ट जारी केला आहे. इराणचा पाठिंबा असलेल्या हौती लढवय्यांनी सौदी अरेबियाची राजधानी रियादवर बॅलेस्टिक मिसाईल आणि ड्रोनने हल्ला केला होता. त्याच्या प्रत्युत्तरात अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने या भागात सुरक्षेसंदर्भातील अर्जंट अलर्ट जारी केला. या भागातील अमेरिकन नागरिकांना अचानक युद्ध सुरू होण्याची शक्यता गृहीत धरून सज्जतेचा इशारा दिला. व्यावसायिक फ्लाईट्स देखील रद्द करण्यात आल्या. या भागातील एअर स्पेस बंद होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प अचानक व्हाईट हाऊसमध्ये दाखल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅम्प डेव्हिड येथील आपलं वास्तव्य अचानक संपवलं अन् ते व्हाईट हाऊसकडे रवाना झाले आहेत. ते अघोषित राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील ब्रिफिंगसाठी रवाना झाले.

इराणच्या अधिकृत स्टेट मीडियाने कोड १०० बाबत मौन बाळगलं आहे. जाणकारांच्या मते आणि ओपन सोर्स इंटेलिजेन्स नेटवर्कने दावा केला आहे की इराणमधील लष्करी हालचाल थेट संघर्षाकडे इशारा करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.