Iran Strait of Hormuz oil toll | होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांवर इराणकडून प्रति बॅरल १ डॉलर 'टोल'ची आकारणी!

युद्धविरामाचा उपयोग शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी केला जाऊ नये यासाठी करडी नजर
Iran Strait of Hormuz oil toll
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo.
Published on
Updated on
Summary

अमेरिकेसोबत दोन आठवड्यांचा युद्धविराम झालेला असतानाही, इराणने या सागरी मार्गावर आपले नियंत्रण अधिक कडक केले आहे.

Iran Strait of Hormuz oil toll

तेहरान : इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. जगातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'तून जाणाऱ्या प्रत्येक तेलवाहू जहाजाकडून आता इराण प्रति बॅरल १ डॉलर इतका 'टोल' वसूल करणार आहे. विशेष म्हणजे, हा कर क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून भरावा लागणार आहे.इराणच्या तेल, वायू आणि पेट्रोकेमिकल उत्पादन निर्यातदार संघाचे प्रवक्ते हमीद हुसेनी यांनी या निर्णयाची पुष्टी केली आहे.

क्रिप्टोकरन्सीमध्येच भरावा लागणार कर

अमेरिकेसोबत दोन आठवड्यांचा युद्धविराम झालेला असतानाही, इराणने या सागरी मार्गावर आपले नियंत्रण अधिक कडक केले आहे. 'फायनान्शिअल टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, हुसेनी यांनी स्पष्ट केले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाची तपासणी केली जाईल. या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचा उपयोग शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी केला जाऊ नये, यावर इराणची करडी नजर आहे. जहाजांवरील तेलाच्या प्रत्येक बॅरलमागे १ डॉलर शुल्क आकारले जाईल. रिकाम्या जहाजांना मात्र विनामूल्य प्रवेश असेल," असे हुसेनी यांनी सांगितले.

Iran Strait of Hormuz oil toll
2026 strait of hormuz crisis: तेल मुत्सद्देगिरीत भारताचे यश

'बिटकॉइन' सारख्या डिजिटल चलनामध्ये होणार व्‍यवहार

निर्बंधांमुळे होणारी जप्ती किंवा व्यवहारांचा मागोवा टाळण्यासाठी हा टोल 'बिटकॉइन' सारख्या डिजिटल चलनामध्ये स्वीकारला जाईल. जहाजांना पैसे भरण्यासाठी केवळ काही सेकंदांचा अवधी दिला जाईल, जेणेकरून हे व्यवहार सुरक्षित राहतील.

Iran Strait of Hormuz oil toll
Energy Crisis | युद्धझळांमध्ये मोठा दिलासा! भारताच्या आणखी 2 LPG टँकर्सना होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याची इराणकडून परवानगी

आदेश न मानल्यास जहाज उद्ध्वस्त करण्याचा इशारा

इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "सागरी सुरक्षा आणि समुद्री सुरुंगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी जहाजांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. या मार्गावरुन जाणार्‍या जहाजांनी आधी ईमेलद्वारे आपल्या मालाची माहिती द्यावी लागेल. परवानगीशिवाय प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांना उद्ध्वस्त करण्याची धमकी देखील देण्यात आली आहे."

Iran Strait of Hormuz oil toll
Iran Israel War Impact: युरोपियन युनियनकडून गॅस साठा कमी करण्याचे आवाहन

सुमारे ३०० ते ४०० जहाजे आखाती देशांतून बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत

जगातील एकूण तेल वाहतुकीपैकी सुमारे २० टक्के वाहतूक याच मार्गातून होते. सध्या सुमारे ३०० ते ४०० जहाजे आखाती देशांतून बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत उभी आहेत. युद्धापूर्वी या मार्गावरून दिवसाला १३५ जहाजे जात असत, मात्र आता इराणच्या कडक तपासणीमुळे दिवसाला केवळ १० ते १५ जहाजेच जाऊ शकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news