Gaza News : गाझामध्ये चिनी कंपन्यांची घुसखोरी, बांधकाम क्षेत्रात ६ हजार कामगार कार्यरत; इस्रायलसाठी केले जातेय काम

या वसाहतींमध्ये केवळ चिनी कामगारच काम करत नाहीत तर त्यांच्या सरकारी आणि खासगी कंपन्याही सेवा देत आहेत.
Gaza News
Gaza News : गाझामध्ये चिनी कंपन्यांची घुसखोरी, बांधकाम क्षेत्रात ६ हजार कामगार कार्यरत; इस्रायलसाठी केले जातेय कामFile Photo
Published on
Updated on

Infiltration of Chinese companies in Gaza, 6 thousand workers are working in the construction sector

गाझा : वृत्तसंस्था

चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर पॅलेस्टिनी नागरिकांच्या हक्कांना पाठिंबा देत असला तरी प्रत्यक्षात सर्व काही उलटे आहे. खरेतर गाझा आणि पॅलेस्टाईनच्या पश्चिम किनाऱ्यावर ज्यू वसाहतींच्या बांधकामात चीनने घुसखोरी केली असून तेथे ६ हजार चिनी कामगार कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नाही या वसाहतींमध्ये केवळ चिनी कामगारच काम करत नाहीत तर त्यांच्या सरकारी आणि खासगी कंपन्याही सेवा देत आहेत.

Gaza News
Israel - Hamas war|इस्‍त्रायलने केलेल्‍या हल्‍ल्‍यात हमासचा नेता मुहम्‍मद सिनवार ठार

२०१६ मध्ये चीन आणि इस्रायलमध्ये झालेल्या करारानुसार, ६ हजार चिनी कामगारांना इस्रायलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक रहिवाशांच्या मते, नाब्लस, रामल्लाह, बेट एल आणि हेब्रोन सारख्या भागात चिनी कामगार बांधकाम करताना दिसत आहेत. चिनी कंपन्यांमध्ये अदामा, तनुवा आणि अहवा या प्रमुख कंपन्या आहेत, त्या गाझातील वसाहतींमध्ये सक्रिय आहेत.

पूर्वी इस्रायली कंपनी असलेली अहवा २०१६ मध्ये चिनी कंपनी पोसून ग्रुपने विकत घेतली आहे. संयुक्त राष्ट्राने ते बेकायदेशीर घोषित केले आहे. या शेतकऱ्यांना मदत अदामा हे चिनी सरकारी मालकीच्या कंपनी केमचायनाने विकत घेतले आहे. ही कंपनी इस्रायलमध्ये कृषी रसायने तयार करते. गाझा युद्धात पॅलेस्टिनींना मदत करण्याऐवजी अदामाने इस्रायली शेतकऱ्यांना मदत केली आहे.

Gaza News
Russia-Ukraine War: रशियाचा युक्रेनवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; 278 ड्रोन युक्रेनमध्ये घुसली!

कंपनीचा कारखाना वेस्ट बँकमधील मिटझपे शालेम येथे आहे, त्याला आंतरराष्ट्रीय समुदाय बेकायदेशीर मानतो. अहवा ही एक सौंदर्य उत्पादन कंपनी आहे. ती इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी प्रदेशातील खनिजांचे शोषण करून उत्पादने तयार करते. तनुवा ही इस्रायलमधील सर्वात मोठी अन्न प्रक्रिया कंपनी आहे, ती दूध, मांस आणि अन्य अन्न उत्पादनांचे उत्पादन करते.

२०१४ मध्ये, चिनी सरकारी मालकीच्या कंपनी ब्राईट फूडने तनुवामध्ये ५६ टक्के हिस्सा खरेदी केला. २०२१ मध्ये तनुवाने मातेह येहुदा परिसरात २२ सार्वजनिक वाहतूक मार्ग सुरू केले, ही सेवा १६ बेकायदेशीर वसाहतींना दिली जाते. तनुवा कंपनी केवळ अन्न उत्पादनांद्वारेच नव्हे तर वाहतुकीद्वारेही या वसाहतींच्या विकासात योगदान देत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news