Python Attack | पत्नीचे पाय दिसले अजगराच्या तोंडात; दृश्य बघून पतीला धक्का

इंडोनेशियामध्ये अजस्त्र अजगराने महिलेला गिळले
Python attack on woman
इंडोनेशियामध्ये एका महिलेला 30 फुटाच्या अजगराने गिळून ठार गेले.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडोनेशियामध्ये एका महिलेला 30 फुटाच्या अजगराने गिळून ठार गेले. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि 2) (स्थानिक वेळेनुसार) सकाळी 7. 30 च्या सुमारास घडली. सिरियाती (वय 36) असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेचा पती एडियन्सा यांना दक्षिण सुलावेसी प्रांतातील सितेबा गावात त्यांच्या घरापासून जवळच तिची चप्पल सापडली, त्यानंतर याचा उलगडा झाला, असे वृत्त 'द सन'ने दिले आहे.

Python attack on woman
ऑस्ट्रेलियात फ्रेममागे आढळला कार्पेट अजगर

Summary

  • इंडोनेशियामध्ये महिलेला 30 फुटाच्या अजगराने गिळले

  • महिला ३ वर्षांच्या आजारी मुलासाठी औषध खरेदी करण्यासाठी गेली होती

  • पतीला अजगराच्या तोंडात दिसले पत्नीचे पाय

  • अजगराने विळखा घालून चिरडून टाकल्याने महिलाचा मृत्यू

३ वर्षाच्या मुलासाठी औषध खरेदी करण्यासाठी महिला बाहेर गेली

याबाबत अधिक माहिती अशी की, सिरियाती, मंगळवारी सकाळी तिच्या ३ वर्षांच्या आजारी मुलासाठी औषध खरेदी करण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती, नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. महिलेचा पती एडियन्सा याला 30 फूट अजगराने तिला खाल्लेले आढळून आल्यानंतर त्याला धक्का बसला.

Python attack on woman
बोरजमध्ये आढळला 15 फूट अजगर

जंगलातून जाताना ३० फूट अजगराचा तिच्यावर हल्ला

सिरीयती एकटी जंगलातून जात होती. यावेळी ३० फूट अजगराने तिच्यावर हल्ला करून तिला गिळून टाकले. त्यानंतर विळखा घालून तिला चिरडून टाकल्याने तिचा मृत्यू झाल्याची सांगितले जात आहे. जेव्हा एडियन्सा तिला शोधले असता तेव्हा सिरियातीचे पाय अजगराच्या तोंडात चिकटले आढळून आले. अजगराचे खूप मोठे पोट पाहिल्यानंतर एडियन्साला संशय आला. त्याने तत्काळ स्थानिक नागरिकांना याबाबत सांगितले.

Python attack on woman
Pythons Smuggling : एक दोन नव्हे तब्बल ४७ अजगर घेवून आला विमानतळावर आणि पुढे…

सिरीयतीला पाच मुले आहेत.

गावचे ग्रामसचिव इयांग एएफपीला सांगितले की, सिरीयतीला पाच मुले आहेत. तिचा धाकटा मुलगा तीन वर्षांचा आहे. तो आजारी असल्याने औषध खरेदी करण्यासाठी ती दक्षिण सुलावेसीच्या लुवू रीजन्सी येथील घरातून बाहेर पडली. त्याआधी ती तिच्या भावाला भेटायला जाणार होती. तिचा भाऊ बराच वेळ तिची वाट पाहत होता, पण सिरीयती आली नाही. त्यामुळे तिच्या भावाने तिच्या पतीला फोन केला. त्यानंतर तिचा शोधाशोध सुरू झाला.

Python attack on woman
हिंगोली : अंजनवाडी परिसरात तब्बल 30 किलो वजनाचा दुर्मिळ अजगर, सर्पमित्रांच्या सहाय्याने रेस्क्यू

मृतदेह सुस्थितीत, पण हाडे मोडली

स्थानिक पोलीस प्रमुख इदुल यांनी एएफपीला सांगितले की, सिरीयतीचा मृतदेह पूर्ण मिळाला आहे. शरीराची स्थिती तशीच होती. पण कदाचित हाडे मोडली असावीत. दक्षिण सुलावेसीमध्ये एका महिन्याच्या आत ही दुसरी घटना घडली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात एका 45 वर्षीय महिलेचा मृतदेह एका अजगराच्या पोटातून बाहेर काढला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news