

वॉशिंग्टन : मुदतपूर्व प्रसूतीसाठी गर्भवती भारतीय महिलांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. नवजात बाळांना अमेरिकन नागरिकत्व मिळण्यासाठी 20 गर्भवती महिलांनी हॉस्पिटलशी संपर्क साधला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 150 वर्षांपूर्वीचा नागरिकत्वासंदर्भातील कायदा रद्द केला आहे. नव्या कायद्याची अंमलबजावणी 20 फेब्रुवारीपासून होणार आहे.
विदेशी नागरिकांच्या अपत्यांना या कायद्यान्वे अमेरिकन नागरिकत्वापासून मुकावे लागणार आहे. त्यामुळे नव्या कायद्याचा अंमल होण्याआधी मुदतपूर्व प्रसूतीसाठी भारतीय गर्भवती महिलांनी रुग्णालयाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मुदतपूर्व प्रसूतीमुळे या महिलांच्या अपत्यांना जुन्या कायद्यान्वे अमेरिकन नागरिकत्व प्राप्त होणार आहे. 19 फेब्रुवारीपर्यंत प्रसूत होणार्या विदेशी मातांच्या अपत्यांना जुन्या कायद्यान्वे अमेरिकन नागरिकत्व मिळणार आहे.