पुढारी ऑनलाईन डेस्कः युक्रेनची राजधानी किव्ह मध्ये १२ मार्चला रशियन मिसाईलने हल्ला केला होता. यामध्ये भारतीय असलेली कुसुम हेल्थकेअर या कंपनीच्या गोदामांना लक्ष्य करण्यात आले होते. पण या आरोपांचे खंडन रशियाने केले आहे. रशियाच्या प्रवक्त्याने सांगितले की आमच्या लष्कराने हा हल्ला केलेला नाही तर युक्रेनच्याच वायुदलाकडून मिसाईल पडल्यामुळे या औषध कंपनीचे नुकसान झाले आहे.
रशियाच्या सैन्य अधिकार्याने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी भारताच्या दूतावसाने रशियाच्या हल्ल्यात भारतीय औषध कंपनीचे नुकसान झाले असल्याचा दावा समाजमाध्यमांवर केला होता. या पोस्टमध्ये म्हटले होते की ‘ क्षेपणास्त्र डागून कुसुम फार्माच्या गोडावूनचे नुकसान करण्यात आले. एकीकडे मॉस्को भारताबरोबर विषेश मित्रता असल्याचा दावा करते तर दुसरीकडे भारतीय उद्योगांवर हमला करते मुलांसाठी व वयोवृद्धांसाठी असलेली औषधे नष्ट करते आहे.’
वरील आरोपांचे खंडन करीत रशियाच्या सैन्याने म्हटले आहे की आमच्या सेनेने युक्रेनचे सैन्यतळ, वायुदलाची रक्षाप्रणाली, ड्रोन असेंब्ली युनिट यांना लक्ष्य केले होते. ही ठिकाणे राजधानी किव पासून दूर आहेत. त्यामुळे आम्ही क्षेपणास्त्र डागून कुसुम फार्माच्या गोडावूनला लक्ष्य केले म्हणने चुकीचे आहे. उलट युक्रेनच्या वायु रक्षा प्रणालीकडून एखादे क्षेपणास्त्र डागले जाऊन ते या औषध कंपनीच्या गोडावूनवर पडले असावे अशीही शक्यता आहे. असे रशियाने म्हटले आहे.