

Varun Suresh charged with murder of sex offender In California :
कॅलिफोर्नियामध्ये २९ वर्षाच्या भारतीय वंशाच्या वरूण सुरेशनं ७१ वर्षाच्या डेव्हिड ब्रिमरचा चाकू भोसकून खून केला. हा हल्ला प्लॅनिंग करून करण्यात आल्याचा दावा फ्रेमोंट पोलिसांनी केलाय. यासाठी आरोपी वरूण सुरेशनं सेक्स ऑफेंडर्सचा पब्लिक डेटाबेसचा वापर केल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं.
द इंडिपेंडंटनं दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांना हिंसक झडप झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांना ब्रीमर हे गंभीर जखमी अवस्थेत आढळणून आले. त्यांच्यावर धारदार शस्त्रानं अनेकवेळा हल्ला केल्याचं दिसत होतं. पोलिसांनी त्वरित त्यांना रूग्णालयात दाखल केलं. मात्र ७१ वर्षाचे ब्रीमर वाचू शकले नाहीत.
दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहचले होते त्यावेळी त्यांना घरासमोर भारतीय वंशाचा २९ वर्षाचा तरूण ब्रीमर यांच्या घराच्या समोरच आढळून आला होता.
पोलिसांनी वरूण सुरेशनं ब्रीमर यांची हत्या कशी केली हे सांगितलं. ते म्हणाले, वरूणनं एक सर्टिफाईड पब्लिक अकाऊंटंट असल्याचं भासवलं होतं. तो नवीन ग्राहक शोधण्यासाठी दोरोदारी फिरतो असं देखील त्यानं पोलिसांना सांगितलं होतं. त्याच्याजवळ एक बॅग, नोटबूक आणि हातात कॉफी होती. तो खरोखरच एक पब्लिक अकाऊंटट वाटत होता.
त्यानं ब्रीमर यांचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर वरूणनं ब्रीमर यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यानंतर वरूण म्हणाला की, मला माहिती आहे की मी योग्य व्यक्तीकडं पोहचलो आहे. त्यानंतर वरूण हा ब्रीमर यांच्या घरात बळजबरीनं घुसला. यानंतर ७१ वर्षाचे ब्रीमर पळून जाण्याच्या इराद्यानं गाडीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले. तो शेजाऱ्यांच्या गॅरेज जवळ आणि किचनमध्ये गेला.
वरूणनं देखील ब्रीमरचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं. त्यानं ब्रीमर यांच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. त्यानं अनेक वार केले. ब्रीमर त्यातूनही सुटण्याचा प्रयत्न करू लागल्यावर वरूण सुरेशनं त्यांचा गळा चिरला. त्याला ब्रीमर यांना संपवायचंच होतं.
दरम्यान, पोलिसांनी वरूण सुरेशला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की सुरेश हा गुन्हा करून पळून जाण्याच्या इराद्यात नव्हता. त्याच्या मते ब्रीमर हा मुलांचं लैंगिक शोषण करत होता. कोणालाच तो आवडत नव्हता. चौकशीदरम्यान वरूण सुरेशनं ७१ वर्षाच्या ब्रीमरचा खून केल्याचा कोणताही पश्चाताप नाही असं सांगितलं होत. त्यानं केलेल्या कृत्याबद्दल वाईट वाटत नसल्याचं सांगितलं. वरूण सुरेश हा ब्रीमर यांना मारताना मजा आली असं म्हणत होता असा दावा पोलिसांनी केला आहे.