वर्णद्वेषी टिप्पणी भोवली, सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाला शिक्षा

चार आठवड्यांचा तुरुंगवासासह आर्थिक दंडही
racist remarks
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सिंगापूरमध्‍ये वर्णद्वेषी टिप्पणी भारतीय वंशाच्‍या तरुणाला भोवली आहे. या प्रकरणी सिंगापूर न्‍यायालयाने तुरुंगवासासह 4,000 सिंगापूर डॉलर दंडही ठोठावण्यात आला आहे. ऋषी डेव्हिड रमेश नंदवानी (२७) असे कारवाई झालेल्‍या तरुणाचे नाव आहे.

काय घडलं होतं?

३१ ऑक्‍टोबर रोजी ऋषी डेव्हिड रमेश नंदवानी हा सिंगापूरमधील एका शॉपिंग कॉम्‍प्‍लेक्‍समध्‍ये गेला होता. येथे महिला कॅशियरने त्‍याला रांगेत उभे राहण्‍यास सांगितले. यावरुन वाद झाला. यावेळी त्‍याने चिनी नागरिकांबाबत वर्णद्वेषी टिप्पणी केली. तसेच रांगे उभे राहण्‍यासही नकार दिला. तसेच काउंटरवर ठेवलेला 'टिप बॉक्स' उचलून महिला कॅशियरवर फेकला. यामध्‍ये ती जखमी झाली. नंदवानी याला अटक करण्‍यात आली.

वर्णद्वेषी टिप्पणी आणि महिलेवरील हल्‍ला या दोन्‍ही प्रकरणी ऋषी डेव्हिड रमेश नंदवानी न्‍यायालयाने दोषी ठरवले. त्‍याला चार आठवड्यांची तुरुंगवास आणि 4,000 सिंगापूर डॉलर दंड ठोठावण्यात आला. अशा प्रकारच्‍या गुन्‍ह्यांमुळे लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होते. सेवा कर्मचाऱ्यांना गैरवर्तनापासून संरक्षण देण्याची गरज आहे, अशी टिपण्‍णीही जिल्‍हा न्‍यायालयाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news