अमेरिकेत भारतीय कुटुंब बेपत्ता; नदीत सापडले साहित्य

कॅलिफोर्निया : पुढारी आनलाईन

अमेरिकेत गेल्या १५ वर्षांपासून राहणाऱ्या भारतीयाचे कुटुंब आठवड्यापूर्वी बेपत्ता झाले आहे. सुट्टीनिमित्त फिरायला गेलेले कुटुंब बेपत्ता झाल्यानंतर नदीमध्ये शोधमोहिम राबवण्यात आली. तेव्हा शोधपथकाला त्यांच्या वाहनाचे तुकडे आणि काही साहित्य मिळाले. मात्र त्या कुटुंबातील कोणाचा शोध लागला नाही.

गुजरातच्या सुरतचे असलेले संदीप थोतापिल्ली आपल्या पत्नी आणि मुलांसोबत १५ वर्षांपासून अमेरिकेत राहतात. ५ एप्रिलला संदीप पत्नी आणि सिद्धांत, साची या मुलांबरोबर फिरायला गेले होते तेव्हापासून बेपत्ता झाले आहेत. पोलिसांनी तपास केल्यानंतर काहीच माहिती न मिळाल्याने संदीपच्या कुटुंबाला बेपत्ता झाल्याचे घोषित करण्यात आले.

बेपत्ता झाल्यानंतर सुरतमध्ये राहणाऱ्याा कुटुंबाने त्यांचा फोटो ट्विट केला. संदीपचे वडिल बाबू सुब्रमण्यम थोतापिल्ली यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीचे आवाहन केले होते. त्यांनी म्हटले होते की, माझा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय गुरुवारपासून बेपत्ता आहेत. त्याची चौकशी होण्यासाठी अमेरिकेतील अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना शोधण्यासाठी मदत करा' या ट्विटनंतर सुषमा स्वराज यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेतील भारताचे अधिकारी याबाबत पाठपुरावा करत असल्याचे स्वराज यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news