sergio gor | अंतराळ क्षेत्रात भारत-अमेरिका भागीदारीची झेप; सहनिर्मितीवर भर : गोर

sergio gor |
sergio gor | अंतराळ क्षेत्रात भारत-अमेरिका भागीदारीची झेप; सहनिर्मितीवर भर : गोर
Published on
Updated on

बंगळुर; वृत्तसंस्था : भारत आणि अमेरिका आता अंतराळ क्षेत्रात केवळ सहकार्यापुरते मर्यादित न राहता सहनिर्मिती या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहेत, असे प्रतिपादन भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी सोमवारी केले. भारतीय उद्योग महासंघ, इस्रो, इन स्पेस आणि न्यूस्पेस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बंगळूर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान आयोजित ९ व्या ‘बंगळूर स्पेस एक्सपो'च्या उद्‌घाट‌नप्रसंगी ते बोलत होते.

अमेरिकेकडे जागतिक दर्जाचे खाजगी भांडवल आणि परिपक्व व्यावसायिक परिसंस्था आहे, तर भारताकडे अतुलनीय अभियांत्रिकी, वैज्ञानिक बुद्धिमत्ता आणि धाडसी स्टार्टअप्स आहेत, असे सांगत गोर म्हणाले, ही भागीदारी एक अशी 'ड्रीम टीम' तयार करते जी अंतराळात अद्‌भुत कामगिरी करेल. आम्ही आता केवळ डेटाची देवाणघेवाण करत नाही, तर उपकरणांची रचना, स्टार्टअप्सना निधी आणि मानवी शोधाचे भविष्य एकत्रितपणे लिहित आहोत.

नासा आणि इस्रोच्या संयुक्त 'निसार' उपग्रहाचे कौतुक करताना त्यांनी नमूद केले की, दोन महिन्यांपूर्वी व्हेनेझुएलात आलेल्या विनाशकारी भूकंपाच्या वेळी निसारच्या रडारने ढग आणि धूळ भेदून मदत पथकांना थेट माहिती दिली व मानवी प्राण वाचवले. तसेच भारताच्या आर्टेमिस करारावरील स्वाक्षरीचा संदर्भ देत गोर यांनी स्पष्ट केले, आम्ही पुन्हा चंद्रावर जात आहोत आणि चंद्राच्या पृष्ठभागावर भारताने आमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहावे, अशी नासाची इच्छा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news