भारत-चीनच्या युद्धनौका एकाच दिवशी कोलंबोमध्ये

आयएनएस मुंबई 410 जणांसह; ड्रॅगनची 3 जहाजे 1,473 जणांसह
India-China warships in Colombo on the same day
भारताची एक आणि चीनच्या तीन युद्धनौका एकाच दिवशी श्रीलंकेच्या कोलंबो या राजधानीच्या बंदरावर दाखल.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोलंबो : भारताची एक आणि चीनच्या तीन युद्धनौका एकाच दिवशी श्रीलंकेच्या कोलंबो या राजधानीच्या बंदरावर दाखल झाल्या. दोन्ही देशांच्या युद्धनौका कोलंबोत 3 दिवसांच्या दौर्‍यावर आहेत.

भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस मुंबई पहिल्यांदाच श्रीलंकेत दाखल झाली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने आयएनएस मुंबईचे दिमाखदार स्वागत केले. हे फेई, वुझिशान आणि किलियनशान या 1,473 जणांसह दाखल चिनी युद्धनौकांचेही श्रीलंकेच्या नौदलकाकडून स्वागत करण्यात आले.

आयएनएस मुंबई युद्धनौकेवर 410 क्रू मेंबर्स आहेत. भारताने श्रीलंकेला भेट दिलेल्या डॉर्नियर जहाजासाठी आवश्यक सुट्या भागांची खेप आयएनएस मुंबईतून आणण्यात आली आहे. श्रीलंकेसोबत संयुक्त सरावही भारतीय युद्धानौकेकडून करण्यात येईल. चिनी युद्धनौका श्रीलंकेत करतात तरी काय, हे जवळून तपासण्याचीही भारतीय नौदलाला ही संधी असल्याचे मानले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news