

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतासोबत 5 महाशक्तिशाली देशांचा एक नवा 5 सुपरक्लब तयार करू इच्छित आहेत. या सुपरक्लबमध्ये भारताला प्रमुख शक्ती म्हणून सामील करण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे. या सुपरक्लबमध्ये भारत, अमेरिकाव्यतिरिक्त रशिया, चीन आणि जपानचा समावेश करण्याची चर्चा आहे.
ट्रम्प यांच्या या योजनेतून हे स्पष्ट होते की, ते भारताला सोबत घेण्याबरोबरच चीन आणि रशियासोबतही आपले संबंध सुधारू इच्छितात. जेणेकरून पूर्व आशियामध्ये अमेरिकेला आपली गमावलेली प्रतिमा पुन्हा सुधारता येईल आणि भारत, रशिया व चीनसारख्या देशांसोबत असलेले शत्रुत्वाचे संबंध कमी करता येतील.
अहवालानुसार, या नव्या गटाचा उद्देश अशा प्रमुख शक्तींचा एक गट तयार करणे आहे, जो जी 7 गटाच्या त्या अटींनी बांधील नसेल, ज्यात सदस्य देश श्रीमंत आणि लोकशाहीवादी असणे आवश्यक आहे. या धोरणातील प्रस्तावित कोअर फाईव्ह (5) मध्ये अमेरिका, चीन, रशिया, भारत आणि जपान या देशांचा समावेश आहे, म्हणजेच ज्या देशांची लोकसंख्या 10 कोटींपेक्षा जास्त आहे. हा गट 7 प्रमाणे नियमितपणे शिखर परिषदा आयोजित करेल.
पॉलिटिकोच्या अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प कथितरीत्या 5 म्हणजेच कोअर फाईव्ह नावाचा एक नवा एलिट जागतिक शक्ती गट स्थापन करण्याचा विचार करत आहेत, ज्यात अमेरिका, रशिया, चीन, भारत आणि जपान यांचा समावेश असेल. यामुळे सध्याचा युरोप-प्रधान 7 आणि लोकशाहीवर आधारित इतर श्रीमंत देशांचे गट बाजूला सारले जातील.
या सैद्धांतिक सी-5 मध्ये युरोपला कोणतेही स्थान नाही, ज्यामुळे युरोपियन लोकांना वाटेल की, हे प्रशासन रशियाला युरोपमध्ये आपला प्रभाव ठेवणारी प्रमुख शक्ती मानते, असेही त्यांनी नमूद केले. पूर्वीच्या ट्रम्प प्रशासनात रिपब्लिकन सिनेटर टेड क्रूझ यांचे सहायक राहिलेले मायकल सोबोलिक म्हणाले की, सी-5 ची स्थापना करणे हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील चीन धोरणापासून पूर्णपणे उलट पाऊल असेल.