अमेरिकेतील व्हिसा घोटाळ्यात १२९ भारतीय विद्यार्थ्यांना अटक 

Published on
Updated on

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेच्या प्रशासनाने अवैध्यरित्या व्हिसा मिळवून अमेरिकेत वास्तव्य करत असल्या प्रकरणी १३० विद्यार्थ्यांना अटक केली आहे. या १३० विद्यार्थ्यांपैकी १२९ विद्यार्थी हे भारतीय असल्याची माहिती अमेरिकेतील प्रशासनाने दिली आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासाने या अटक झालेल्या १२९ विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची मदत करण्यासाठी हॉटलाईन सुरु केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी अटक झाल्याने ज्यांची मुले अमेरिकेत शिकण्यासाठी गेली आहेत त्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अमेरिाकेच्या होमलँड सिक्युरिटीने अवैध्य व्हिजा रॅकेटचा भांडा फोड करण्यासाठी  डेट्रॉईड फार्मिंगटन हिल्स या विद्यापीठाच्या माध्यमातून एक गुप्त ऑपरेशन सुरु केले होते. या ऑपरेशनच्या माध्यमातून 'पे अँड स्टे' रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला. हे रॅकेट एक भारतीय ग्रुप चालवत होता. या रॅकेटच्या मध्ये जवळपास ६०० विद्यार्थी अडकले आहेत. भारतीय दुतावासाने या अडकलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी cons3.washington@mea.gov.in.  यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे. 

फेडरल तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याने सांगितले 'या विद्यापीठाच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठाचे प्रोग्राम अवैध्य आहे याची कल्पना होती. या सर्व विद्यार्थ्यांना परत मायदेशी पाठवण्यात येणार आहे.' पण, सध्या या मुलांना ताब्यात घेतले आहे. काही विद्यार्थ्यांच्या पायात ट्रॅकिंग उपकरण बसवण्यात आली आहेत. जेणेकरून ते एका विशिष्ठ परिसराच्या पलिकडे जावू शकणार नाहीत. 

आयसीईच्या आकडेवारीनुसार २०१७मध्ये जवळपास २ लाख ४९ हजार ७६३ भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news