धोक्याची घंटा! चीनमधून आणखी एका व्हायरसचा उद्रेक; आरोग्य यंत्रणा सतर्क; HMPV ची लक्षणे काय?

Human Metapneumovirus | चीनमधील रुग्णालयांत गर्दी वाढली, आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
HMPV, Human Metapneumovirus
चीनमध्ये कोरोना सारख्याच ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरसच्या वाढत्या प्रसाराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमध्ये आणखी एका व्हायरसमुळे हाहाकार उडालाय. चीनमध्ये श्वसनाशी संबंधित जीवघेणा आजार पसरल्याने रुग्णालयांत लोकांची गर्दी वाढली आहे. तसेच आरोग्य सेवेवर ताण असल्याच्या तक्रारी येत आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी विशेषत: कोरोना सारख्याच ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) च्या वाढत्या प्रसाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही ऑनलाइन व्हिडिओत रुग्णालयांत गर्दी वाढल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडिया यूजर्सनी इन्फ्लूएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोरोना यासह अनेक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

चीनच्या उत्तरेकडील भागात प्रादुर्भाव वाढला

चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा व्हायरसचा प्रादुर्भाव चीनच्या उत्तरेकडील भागात वाढत आहे. चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने याची पुष्टी केली आहे. या व्हायरसमुळे चीनचा उत्तर भाग सर्वाधिक प्रभावित आहे. एचएमपीव्ही हा व्हायरस सर्व वयोगटातील लोकांना संक्रमित करू शकतो. मुलांमध्ये त्याचे प्रमाण सर्वात सामान्य आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्याबाबत चिंता वाढली आहे.

सध्याची परिस्थिती गंभीर

सोशल मीडियावरील रिपोर्टंसनी सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. तरीही चिनी अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या टप्प्यावर आणीबाणीचीची घोषणा केलेली नाही.

Human Metapneumovirus | कोणतीही लस नाही

हा व्हायरस २० वर्षांपूर्वी आढळून आला होता. त्यावर अद्याप कोणतीही लस निघालेली नाही. त्याच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपायांच्या गरजेबद्दल जागरुकता वाढली आहे. विशेषत: हा व्हायरस जवळपास दोन दशकांपूर्वीच आढळून आला असताना त्यावर कोणतीही लस अस्तित्वात नाही.

खबरदारीचा सल्ला

आरोग्य तज्ज्ञांनी या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता आणि सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लोकांना हात धुणे आणि मास्क वापरण्याचा आणि इतर खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आशियाई देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क

चीनमध्ये झालेल्या एचएमपीव्ही व्हायरसच्या उद्रेकामुळे संपूर्ण आशियाई देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. चीनच्या आजूबाजूच्या प्रदेशांनीदेखील देखरेखीबाबत कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दरम्यान, हाँगकाँगमध्ये या व्हायरसच्या कमी प्रकरणे आढळून आली आहेत.

जपानमध्येही धोका वाढला

दरम्यान, जपानची आरोग्य यंत्रणा या समस्येवर उपाय म्हणून सक्रियपणे काम करत आहेत. जपान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार, देशभरातील ५ हजार रुग्णालये आणि क्लिनिकमध्ये १५ डिसेंबरपर्यंत एका आठवड्यात फ्लूच्या ९४,२५९ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्याच्या हंगामात जपानमधील एकूण प्रकरणांची संख्या आता ७ लाखांवर पोहोचली आहे.

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) म्हणजे काय?

ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस हा श्वसनाशी संबंधित व्हायरस आहे. जो प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांना संक्रमित करु शकतो. यामुळे ताप, खोकला आणि नाक चोंदणे यासारखी सर्दी अथवा फ्लूची लक्षणे दिसून येतात.

याचा धोका काय?

  • गंभीर परिस्थितीत ब्रोंकायटिस अथवा न्यूमोनिया होऊ शकतो. विशेषतः पाच वर्षाखालील मुलांना आणि वृद्धांना याचा धोका अधिक आहे.

  • यासाठी विशिष्ट लस अथवा अँटीव्हायरल उपचार उपलब्ध नसल्याने प्रकृती गंभीर बनू शकते.

काय काळजी घ्यावी?

साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवावेत.

वारंवार स्पर्श केलेल्या वस्तू निर्जंतूक करा.

या व्हायरसने संक्रमित व्यक्तींशी संपर्क टाळावा.

HMPV, Human Metapneumovirus
टोमॅटो आणि कोलेस्ट्रॉल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news