Houthi Attacks Saudi Arabia: हूतींचा जेद्दा, जाजान, आभा शहरांवर हल्ला.. सौदी अरेबियात इमर्जन्सी अलर्ट; तेलाच्या किंमती वाढणार?

Houthi Attacks Saudi Arabia: हूतींचा जेद्दा, जाजान, आभा शहरांवर हल्ला.. सौदी अरेबियात इमर्जन्सी अलर्ट; तेलाच्या किंमती वाढणार?
Published on
Updated on

Houthi Attacks Saudi Arabia: यमेनच्या हूती कट्टरवादी संघटनेने दक्षिण-पश्चिम सौदी अरेबियातील खमीस मुशैत मधील लष्करी एअबेसवर हल्ला केला आहे. हूतींनी हा हल्ला सौदीने नुकतचे यमेमध्ये केलेल्या हवाई हल्ल्याचे प्रत्युत्तर आहे असं म्हटलं आहे. हूती हल्ल्यात सैमदीच्या खमीस मुशैत, आभा आणि ताइफ सह अनेक दक्षिणी शहरांमध्ये इमर्जनसी अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्यात १३ नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Houthi Attacks Saudi Arabia: हूतींचा जेद्दा, जाजान, आभा शहरांवर हल्ला.. सौदी अरेबियात इमर्जन्सी अलर्ट; तेलाच्या किंमती वाढणार?
Mecca Joint Defence Agreement | सौदी अरेबिया, पाकिस्तान अन् तुर्किये यांच्यात मक्का लष्करी करारावर सही

हूतींनी सैदी अरेबियाला केलं टार्गेट

हूतींनी पुन्हा एकदा सैदी अरेबियाला टार्गेट केलं असून दावा केला आहे की त्यांनी दक्षिण पश्चिमी सौदी अरेबियाच्या खमीश मुशैतमध्ये अनेक मिसाईल आणि ड्रोन फायर केले. त्यांनी एका लश्करी एअर बेसला देखील टार्गेट केल्याचा दावा हूतींनी केला आहे.

या हल्ल्यात १३ नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र सौदीच्या सिव्हिल डिफेन्सने सांगितलं की आता हल्ल्याचा धोका टळला आहे. सैदीच्या अधिकाऱ्यांनी खमीस मुशैत, आभा आणि ताईफसह दक्षिणेतील अनेक शहरांमध्ये इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात जेद्दा, आभा आणि जजान या शहरांचा देखील समावेश आहे.

Houthi Attacks Saudi Arabia: हूतींचा जेद्दा, जाजान, आभा शहरांवर हल्ला.. सौदी अरेबियात इमर्जन्सी अलर्ट; तेलाच्या किंमती वाढणार?
Pakistan-Saudi Arabia Agreement | भारताशी युद्ध झाल्यास सौदी अरेबिया मैदानात

रियादमध्ये आपत्कालीन बैठक

हूतींच्या या हल्ल्याला रोखण्यांसाठी रियादमध्ये एक आपत्कालीन बैठक देखील झाली. हूतींनी ड्रोन आणि मिसाईल्स हल्ला वाढवला असून आता सौदी आणि यमेनचे लष्कर हवाई हल्ले करून प्रत्युत्तर देत आहेत.

याचदरम्यान, सैदी अरेबियाच्या सिव्हिल डिफेन्सने तांबडा समुद्राच्या किनारी भागातील अनेक शहरात धोक्याचे सायरन वाजल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्याची गंभीर स्थिती पाहून जेद्दा एअरपोर्टवरील फ्लाईट्सची उड्डाणे देखील तात्पुरती थांबवण्यात आली आहेत.

सौदी अरेबियाने नुकतेच यमेनमध्ये एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्यातील विमान हँगर, रडार सिस्टम, रनवे आणि दारूगोळा हूतींनी टार्गेट केला आहे. आता हूतींनी आपला हल्ला तीव्र केला आहे.

Houthi Attacks Saudi Arabia: हूतींचा जेद्दा, जाजान, आभा शहरांवर हल्ला.. सौदी अरेबियात इमर्जन्सी अलर्ट; तेलाच्या किंमती वाढणार?
Cooking Oil : ४ जणांचे कुटुंब? महिन्याला फक्त इतकंच तेल मागवा; जास्त तेल ठरू शकतं धोकादायक!

कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम

तांबड्या समुद्राच्या तोंडावर असलेल्या पेरिम द्वीपच्या कंट्रोलसोबतच हूती आता संघर्षात वरचढ ठरत आहे. त्यामुळं सौदी अरेबियातील तेल निर्यातीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या हवाई हल्ल्यामुळे सौदी अरेबियाच्या ईस्ट-वेस्ट पाईपलाईन ठप्प झाली होती.

सौदी अरेबियाने १९८० च्या दशकात होर्मुजचा पर्याय म्हणून १२०० किलोमीटर लांब पाईपलाईन बनवली होती. तेलाच्या व्यापाऱ्यांनुसार जर पाईपलाईन जास्त काळासाठी बंद राहिली तरी जागतिक तेल पुरवठ्यात ४ टक्क्यांची कपात होऊ शकते. त्यामुळं कच्च्या तेलाच्या किंमती ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news