Hormuz Strait | होर्मुझ तूर्त खुली होणार नाही; अमेरिकन गुप्तचर खात्याचा अहवाल

Hormuz Strait
इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्‍याचा निर्णय घेतल्‍याने जगाची चिंता वाढली आहे.Pudhari
Published on
Updated on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : जागतिक तेलपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणने आपला प्रभाव कायम ठेवला असून, ती लवकर उघडण्याची शक्यता कमी असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात नमूद करण्यात आले आहे. या परिस्थितीमुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्तहोत आहे.

इराणचा सामरिक डाव

या अहवालानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण हे इराणसाठी अमेरिकेविरुद्धचे सर्वात प्रभावी अस्र आहे. त्यामुळे इराण या मार्गावर अडथळे निर्माण करून जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम करत आहे. तेलाच्या किमती वाढवून अमेरिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे दिसते.

अमेरिकेची भूमिका आणि आव्हाने

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याचा दावा केला असला, तरी तज्ज्ञांच्या मते हा प्रयत्न अत्यंत खर्चिक आणि धोकादायक ठरू शकतो. इराणविरुद्ध लष्करी कारवाई केल्यास दीर्घकालीन युद्धाचा धोका वाढू शकतो.

अमेरिकेतील राजकीय परिणाम

ऊर्जा दरवाढीमुळे अमेरिकेत महागाई वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा राजकीय फटका ट्रम्प प्रशासनाला बसू शकतो. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे.

समुद्री वाहतुकीवर परिणाम

इराणने व्यापारी जहाजांवर हल्ले, सागरी माईन्स टाकणे आणि मार्ग शुल्क लावणे अशा उपाययोजना करून समुद्री वाहतूक मोठ्या प्रमाणात अडथळ्यात आणली आहे. यामुळे अनेक देशांमध्ये इंधनटंचाई निर्माण झाली असून तेलाचे दर उच्चांकावर पोहोचले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news